बाळासाहेब ठाकरेंवर हिंदीतून चित्रपत
मुंबई, दि. 03, ऑक्टोबर - ना उद्धव ठाकरे, ना राज ठाकरे आणि ना संजय राऊत, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर हिंदी चित्रपट बनवण्याच्या शर्यतीत राहुल ठाकरे बाजी मारणार अशी चिन्हं दिसत आहेत. राहुल ठाकरे हे बाळासाहेबांचे नातू आहेत. बाळासाहेबांचे मधले चिरंजीव जयदेव आणि त्यांच्या पहिल्या पत्नी स्मिता ठाकरे यांचे राहुल हे सुपुत्र आहेत. त्यांनी कॅनडात फिल्म मेकिंगचं शिक्षण घेतलं आहे. आमिर खानच्या पीके चित्रपटासाठी त्यांनी राजू हिरानी यांचा सहाय्यक म्हणूनही काम पाहिलं होतं. राहुल यांनी आता आपल्या लाडक्या आजोबांवर म्हणजे बाळासाहेबांवर बायोपिक बनवण्याचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट हाती घेतला आहे. त्याची माहिती त्यांनी दसर्याला फेसबुकवर टीझर पोस्टर रिलीज करून दिली. मुंबईतल्या माहीमच्या मुख्य नाक्यावरही काल रात्री या चित्रपटाचं बॅनर झळकताना दिसलं.