तटकरे यांच्यावरील पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम फडणवीस यांनी स्वीकारलाच कसा -रामदास कदम
नांदेड, १० ऑक्टोबर - सिंचन घोटाळ्याप्रकरणी ज्यांची चौकशी सुरु आहे अशा सुनील तटकरे यांच्यावरील पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारलाच कसा असा सवाल शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज येथे केला . अंमलबजावणी संचालनालयाकडून ज्यांची चौकशी चालू आहे अशा शामसुंदर शिंदें यांच्या घरी मुख्यमंत्री चहापानाला जातात या वरून मुख्यमंत्री गुन्हेगारांना पाठीशी घालतात अशी टीका कदम यांनी केली. आज मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेला त्यांनी उत्तर दिले.शिवसेनेचे आमदार ,नगरसेवक फोडून गददारांना घेवून निवडणूक लढवत मुख्यमंत्री नैतिकतेची भाषा बोलत आहेत.शिवसेना कॉगे्रसला मदत करत असल्याच्या टीकेला उत्तर देताना कदम म्हणाले की कॉग्रेसे विखे पाटील पुणतांब्याच्या शेतकर्यांना घेवून मुख्यमंत्र्यांना भेटतात आणि भावासारखे नाते सांगतात यावरून कॉग्रेस कोणाला मदत करतंय हे उघड आहे