Breaking News

येत्या रविवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे ’रंगभूमी दिन सोहळा’

पुणे, दि. 01, नोव्हेंबर - नाट्य आणि सिने सृष्टीतील अभिनेते रमेश भाटकर, अशोक शिंदे आणि चेतन दळवी यांना सलाम पुणे पुरस्कार जाहीर झाला आहे. चुकवू नये अशी...न ृत्य, गाणी आणि कलावंताच्या सन्मानाची रम्य सायंकाळ मानल्या जाणार्‍या सलाम पुणेच्या रंगभूमी दिन सोहळ्यात हे पुरस्कार आयुष मंत्री श्रीपाद नाईक माजी शिक्षणमंत्री वसंत  पुरके तसेच शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, अरविंद शिंदे, अविनाश बागवे, भाजपचे संदीप खर्डेकर नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, सुहास कुलकर्णी, उज्वल केसकर, नगरसेवक  गोपाल चिंतल आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. अभिनेत्री आणि निर्माती तृप्ती भोईर, हॉलबेस्ट अक्ट्रेस पुरस्कार विजेती बॉलीवूडची अ भिनेत्री किरण दुबे, दाक्षिणात्य सिनेमा गाजविणारी मराठी अभिनेत्री डिम्पल चोपडे यांच्यासह असंख्य मान्यवर कलावंतांच्या उपस्थितीत हा सोहळा होतो आहे. येत्या रविवार दिनांक  5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे हा सोहळा संपन्न होणार आहे. अभिनेत्री तृप्ती भोईर दाक्षिणात्य अभिनेत्री डिम्पल चोपडे, शहर काँग्रेसचे  अध्यक्ष रमेश बागवे, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले आणि सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर या समारंभाला उपस्थित रहाणार आहेत. अभिनेता मयूर लोणकर, अ भिनेत्री मालविका बर्वे, नृत्यदिग्दर्शक सचिन घोरपडे आदी कलावंतांच्या संचाकडून यावेळी गाणी नृत्य अशा बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये विविध क लाकारांच्या गुणांचे अविष्कार रसिकांना पाहायला मिळतील.हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामुल्य असून पहिल्या 5 रांगा, मान्यवर पाहुणे, कलाकार, नगरसेवक आणि पत्रकार  यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ सिनेपत्रकार आणि लेखक सुभाषचंद्र जाधव या कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि निवेदन करणार आहेत.