Breaking News

हिंजवडीच्या कंपनीला दणका, 17 कोटींची फसवणूक

पुणे, दि. 01, नोव्हेंबर - रॉकेट सिंगने हिंजवडीच्या एका कंपनीला दणका देऊन 17 कोटींची फसवणूक केली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात उज्वल रैदाणी (वय 39  रा. कोथरुड) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारीमध्ये म्हटले आहे की, हिंजवडी फेज 1 मध्ये त्यांच्या मालकीची टेक्नो प्लॉटवेअर प्रा. लि. आहे. या कंपनीमध्ये काम करणार्‍या तीन क र्मच्या-यांनी कंपनीची गोपनीय माहिती चोरली, ती डिलीट केली व या कंपनीचे एकमेव ग्राहक असलेल्या टेस्टलॅब कंपनीशी परस्पर संधान साधून त्यांच्या सोबत भागीदारीमध्ये  टेस्टलॅब मरिन सॉफ्टवेअर कंपनी चालू केली. ही फसवणूक जानेवारी 2016 ते जुलै 2017 या कालावधीत झाली. यामध्ये उज्वल रैदाणी यांच्या कंपनीचे 17 कोटींचे नुकसान  झाले. त्यातच ही कंपनी बंद पडली. या प्रकरणी त्यांनी कंपनीतील तीन कर्मचा-यां विरुद्ध फसवणूक व आर्थिक नुकसानीचा गुन्हा दाखल केला आहे