सातव्या वेतनश्रेणीसाठी एसटीचा ऐन दिवाळीत संपाबाबत कामगार संघटनात मतभेद
औरंगाबाद, दि. 16, आक्टोबर - महाराष्ट ्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांना सेवाज्येष्ठतेनुसार पदनिहाय सातवा वेतन आयोगातील वेतनश्रेणी वेतन निश्चिती, विविध भत्ते व सेवा सवलती मिळाव्यात आदी मागण्यांसाठी एसटीच्या संघटनांनी ऐन दिवाळीत 17 ऑक्टोबर पासुन संपाचा इशारा दिला आहे मात्र या संपाबाबत कर्मचारी संघटनामध्ये मतभेद आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर संपाचे शस्त्र उपसल्याने काही कर्मचारी संघटना संपात सहभागी होणार नाहीत. एसटी महामंडळाचे पदाधिकारी परिवहन मंत्री व मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केल्यानंतरच संप पुकारणे अपेक्षित असल्याचे काही संघटनांचे मत आहे. दिवाळीच्या गर्दीच्या हंगामात संपामुळे प्रवाशांची गैरसोय होणार असल्यामुळे या कर्मचारी संघटना संपातुन बाहेर पडल्याने मतभेद सुरु आहेत. प्रवाशांचे हित महत्त्वाचे प्रवासी आमचे दैवत आहेत. प्रवाशांची गैरसोय होईल, असे आम्ही वागणार नाही, दिवाळी सण मोठा असल्यामुळे गावी सहलीला जात असतात. आम्ही आमच्या कर्तव्यावर जाऊन प्रवाशांच्या सेवेत हजर राहू. प्रवाशांना त्रास होणार नाही, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आम्ही संपात सहभागी होणार नाही. असे एसटीतील शिवसेना कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी शिवाजीराव बोर्डे यांनी सांगितले. तर संप यशस्वी होणारच यामुळे प्रवास टाळून संघटनेला सहकार्य करावे असे एसटी कर्मचारी काँगे्रसचे विभागीय सचिव कमलाकर पटवर्धन यांनी म्हटले आहे.