Breaking News

परिवहन खात्यात 115 कोटीं 61 लाखांची वसुली

औरंगाबाद, दि. 16, आक्टोबर - विविध कारवायांच्या उद्दिष्टपूर्तीसह देण्यात येणार्या महसुली उद्दिष्टपूर्तीकरिता आरटीओ कार्यालयात धडपड सुरू असून, विभागाकडून 115 कोटी  61 लाखांचा महसूल वसूल करण्यात आला आहे. 269 कोटी 4 लाखांचे महसूल उद्दिष्ट विभागाला आहे. औरंगाबाद प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत बीड व जालना ही दोन व  औरंगाबाद एक असे एकूण 3 कार्यालये येत असून, सुरू असलेल्या आर्थिक वषारसाठी विभागाला एकूण 269 कोटी 4 लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, यापैकी औरंगाबाद क रिता 188 कोटी 97 लाख, जालना जिल्ह्यासाठी 41 कोटी 77 लाख व बीडकरिता 38 कोटी 30 लाखांचे उद्दिष्ट परिवहन कार्यालयाकडून देण्यात आले. एप्रिल ते ऑगस्ट या पाच  महिन्यात औरंगाबाद कार्यालयाने 82 कोटी 45 लाखांचा महसूल वसूल केला तर जालना 15 कोटी 72 लाख व बीड जिल्ह्यासाठी 17 कोटी 44 लाखांचा महसूल असा एकूण 115  कोटी 61 लाखांचा महसूल विभागाने वसूल केला आहे. सध्या सप्टेंबर महिन्यांची वसूल महसुली आकड्यांची गणिते विभागात मांडल्या जात आहेत. आगामी सहा महिन्यात महसुली  उद्दिष्टपूर्ण करण्यासाठी निरीक्षकांकडून जोर दिला जाईल, त्यामुळे उद्दिष्टपूर्ती पूर्ण करूच, असा निर्धार व्यक्त केला जात आहे.