Breaking News

समृद्धी महामार्गाच्या विरोधात काळे आकाशकंदिल लावून अनोखे आंदोलन

औरंगाबाद, दि. 19, ऑक्टोबर - प्रस्तावित मुंबई-नागपूर महामार्गासाठी जमीन देण्यास जिल्ह्यातील विविध प्रकल्प बाधीत शेतकर्‍यांनी ऐन दिवाळीत विरोध केला आहे. प्रशासनाचा  निषेध व्यक्त करीत घरावर काळे आकाश दिवे लावून या महामार्गास विरोध दर्शविला आहे. समृद्धी महामार्गासाठी लागणार्‍या जमिनीची खरेदी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.  शेतकर्‍यांचा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असला तरी फतियाबाद येथील शेतकर्‍यांनी प्रकल्पास विरोध केला आहे. त्यांनी यंदा काळी दिवाळी  साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. गंगापूर तालुक्यात फतियाबाद येथे शेतकरी कृती समितीच्या वतीने शासनाचा तीव्र निषेध करण्यात आला. गावातील शेतकर्‍यांनी आपल्या  घरांवर काळे आकाश दिवे लावून दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. येथील शेतकर्‍यांनी कोणतीही खरेदी न करता, घराला रंग, कपड्यांची खरेदी, गोडधोड पदार्थ न क रण्याचा एकमुखी निर्णय घेतला. ऐन दिवाळीत समृद्धी महामार्गास विरोध दर्शविला आहे. वडिलोपार्जित जमीन समृद्धी महामार्गास देण्यासाठी शेतकर्‍यांनी नकारात्मक भूमिका  घेतल्यामुळे या महामार्गास शेतकर्यांचा विरोध होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन, शेतकरी तसेच शासनाच्या कात्रीत सापडल्याने जमीन संपादीत क रण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाला आहे.