Breaking News

विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाची भरपाई कशी करणार- आदित्य ठाकरे

मुंबई, दि. 26, ऑक्टोबर - मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची नियुक्ती करताना पूर्वीच्या चुका टाळून या पदासाठी सर्वार्थाने लायक असलेल्या व्यक्तीचीच नियुक्ती केली जावी असे मत  विद्यार्थी सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे . 
कुलगुरूपदावरून डॉ . देशमुख यांची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी ट्विटर द्वारे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे . त्यात त्यांनी म्हटले आहे की ’ आता  पुन्हा चूक नको , कुलगुरू म्हणून एखादी लायक व्यक्ती नेमावी , ऑनलाईन असेसमेंट चा त्रास विद्यार्थी आणि शिक्षकांना देऊ नये , कार्यप्रणाली सुधारा ’ .
आदित्य ठाकरे यांनी आणखी एका ट्विट मध्ये म्हटले आहे की , कुलगुरूपदावरून डॉ . देशमुख यांची हकालपट्टी झाली . मात्र ज्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले , वर्ष वाया गेले त्याची  भरपाई सरकार आणि विद्यापीठ कशी करणार ?
आदित्य ठाकरे यांनी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल जाहीर होण्यात झालेल्या विलंबाचा मुद्दा चांगलाच लावून धरला होता . या साठी विद्यार्थी सेनेतर्फे विद्यापीठ परिसरात  आंदोलन केले गेले होते.