सर्प प्रदर्शन करताना सर्पमित्राला चावला कोब्रा
औरंगाबाद, दि. 08, ऑक्टोबर - वन्यजीव सप्ताहात सर्प प्रदर्शन करताना सर्पमित्राला कोब्रा जातीच्या सापाने दंश केल्याची घटना घडली असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की सर्पमित्र डॉ. किशोर पाठक यांनी वन्यजीवन सप्ताहा निमित्त एक कार्यक्रम आयोजित केला होता त्यात ते वेगवेगळया प्रकारच्या सापांची माहिती सादर करत होते आणि त्या सापांना हातात धरून माहिती सांगत होते.आज त्यांनी चपळ आणि विषारी असलेल्या कोब्रा जातीच्या सापाला हातात घेतले असता त्या सापाने त्यांना एकदम दंश केला.तेथे उपस्थित असणार्या त्यांच्या सहकार्यांनी सापला जाळीत ठेवून प्रसंगावधान बाळगून पाठक यांना तातडीने खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.