Breaking News

यशासाठी कलेची साधना आवश्यक - अभिनेत्री नेहा जोशी

नाशिक, दि. 01, नोव्हेंबर - जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर यश अपयश वाट्याला येते. कलाकाराबरोबरच उत्तम माणूस असणे महत्त्वाचे आहे. दैनंदिन जीवनात वावरताना  विद्यार्थ्यांनी आपल्या डोळयासमोर विशिष्ट व्यक्तींचा आदर्श ठेवणे तितकेच आवश्यक आहे. अंगात उर्जा आणि उत्साह असला तरी कलाक्षेत्रात यश मिळवायचे असेल तर कलेची  साधना आवश्यक आहे, असे प्रतिपादन अभिनेत्री नेहा जोशी यांनी आज नाशिक येथे बोलताना व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने आयोजित युवक कें द्रीय महोत्सवाचे उदघाटन अभिनेत्री नेहा जोशी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
नेहा जोशी म्हणाल्या, नाटक किंवा अभिनय डोक्यात असतो. त्यामुळे आपापल्या कलागुणांवर विश्‍वास ठेवा. आपल्यातील गुणांचा वापर होणार्‍या घटकांशी सामावून घेतल्यास यश नि श्‍चित मिळते. कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर कठोर मेहनतीशिवाय पर्याय नाही. अभिनय क्षेत्रही त्याला अपवाद नाही. अभिनयात तुम्ही कसे दिसता यापेक्षा तुम्ही किती  कसदार अभिनय करता याची पारख आधी होत असते. तुम्ही तुमच्या कामातून प्रतिबिंबित व्हा आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. आज मला मिळालेले यश हे प्रेक्षकांनी  दिलेल्या कौतुकाची पावती आहे. कला क्षेत्रात आज आपण स्थिरावलो असलो तरी मुक्त विद्यापीठानेच आपल्याला प्रथम संधी दिली असून काही दिवसांपूर्वीच सावित्रीबाई फुले यांचे  पात्र साकारल्याने शिक्षण घेण्याची आवड निर्माण झाल्याचे नेहा जोशींनी आवर्जून सांगितले.
आपल्या कामावरची निष्ठा आणि श्रद्धा कायम जोपासणे गरजेचे असून आजकालच्या परिस्थितीत माणसे वाचणे अधिक महत्त्वाचे बनले आहे.जीवनात यशाची शिखरे पादाक्रांत क रायची असल्यास योग्य संधी आणि योग्य वेळ मिळून यावी लागते, हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे.कलाकार आणि खेळाडूंसाठी मुक्त विद्यापीठाच्या विविध संधी उपलब्ध असल्याचे  सांगत विद्यार्थ्यांना युवक महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या. मुक्त विद्यापीठ समाजातील विविध घटकांसाठी खुल्या केलेल्या शिक्षणाच्या संधींचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा  असे आवाहन त्यांनी केले.