रेल्वे अटेंडंटच्या मदतीने लॅपटॉपची तस्करी
नागपूर, दि. 11, ऑक्टोबर - लॅपटॉप व प्रोजेक्टरची अवैधपणे वाहतूक करणार्या रेल्वे अटेंडन्टला आरपीएफ गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. ही कारवाई मंगळवारी 10 ऑक्टोबर रोजी यशवंतपूर- दानापूर एक्स्प्रेसमध्ये करण्यात आली. अटेंडन्टच्या ताब्यातून तीन बॅगमधील 14 लॅपटॉप व 4 प्रोजेक्टर असा एकूण 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कारवाईनंतर संपूर्ण मुद्देमाल कस्टम विभागाच्या स्वाधीन करण्यात आला.
सुशिलकुमार अमरेंद्र नारायण (40, रा. जयप्रकाशनगर, पाटणा) असे अटकेतील अटेंडन्टचे नाव आहे. तो यशवंतपूर- दानापूर एक्स्प्रेसच्या बी-4 बोगीत कर्तव्यावर होता. चार लाखांचे हे साहित्य त्याने चेन्नईहून दिनेश नावाच्या व्यक्तीजवळून घेतले आणि पाटण्याला पोहोचविणार होता. प्रति बॅग हजार रुपये याप्रमाणे त्याला तीन बॅगचे 3 हजार रुपये मिळणार होते. संपूर्ण मुद्देमाल विदेशी असून कुठल्याही प्रकारची कागदपत्रे नाहीत. अटेंडन्ट असल्याने तो नियोजितस्थळी सहज मुद्देमाल पोहोचवू शकतो हे लक्षात घेऊन त्याला तस्करीत सहभागी करण्यात आले होते.
आरपीएफ गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या सूचनेनुसार नागपूर रेल्वे स्थानकावर गाडी आल्यानंतर गाडीची झाडाझडती सुरू केली. यावेळी त्यांना एस -4 बोगीत बेडशीट ठेवण्याच्या जागी तीन बॅग आढळून आल्या. पथकाने या बॅगविषयी विचारपूस केली असता त्याने समाधानकार उत्तर दिले नाही. बॅगसह अटेंडन्टला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता उपरोक्त माहिती त्याने पथकाला दिली. क ारवाईनंतर संपूर्ण मुद्देमाल कस्टम विभागाच्या सुपूर्द करण्यात आला. ही कारवाई मध्य रेल्वेचे वरिष्ठ सुरक्षा आयुक्त ज्योतीकुमार सतीजा यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.