Breaking News

पिंपरी-चिंचवड शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी संध्याकाळ बंद

पुणे, दि. 04, ऑक्टोबर - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी पुरवठा विभागाची नियमीत दुरुस्तीची व काही  तातडीची आवश्यक कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे येत्या गुरुवारी (दि.5) पिंपरी-चिंचवड शहराचा संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे, असे  महापालिकेने कळविले आहे.पिंपरी पालिकेच्या सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी पुरवठा विभागाची नियमीत दुरुस्तीची व काही तातडीची  आवश्यक कामे करणे, विद्युत विभागातील रावेत पंपींग स्टेशनमधील तातडीची आवश्यक कामे, शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीची कामे करण्यात येणार  आहेत. त्यामुळे गुरुवारी (दि.5) पालिकेतर्फे सकाळी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.त्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे शहरातील सर्व भागाचा सायंकाळचा पाणीपुरवठा  होणार नाही. दुरुस्तीच्या कामासाठी सर्व पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवल्यामुळे दुस-या दिवशी म्हणजे शुक्रवारी (दि.6) सकाळचा पाणीपुरवठा अनियमित होण्याची  शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन, पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.