Breaking News

विवाहित महिलेवर चाकूने हल्ला करणारा तरुण अटकेत

मुंबई, दि. 23, ऑक्टोबर - विक्रोळीत काम करणा-या विवाहित महिलेच्या कार्यालयात घुसून शनिवारी रात्री तिच्यावर चाकूने हल्ला करणा-या तरुणाला पोलिसांनी अटक केली.  साबीर हसन मोहम्मद खान असे या तरुणाचे नाव असून तो वाकोला येथे रहातो.
साबीर व सदर महिलेची आधीच्या कार्यालयातील ओळख होती. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाला असून महिलेचे अश्‍लील चित्रिकरण करून हा सावीर तिला ब्लॅक मेल क रण्याबरोबरच तिच्यावर वारंवार बलात्कारही करत होता. शनिवारी रात्री साबीर पीडित महिलेल्या कार्यालयात गेला. त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता साबीरने महिलेवर  चाकूचा हल्ला केला. यात महिला गंभीर जखमी झाली असून तिचा चेहरा व हातावर मिळून 33 टाके पडले आहेत. अधिक तपासानंतर पोलिसांनी साबीरला ताब्यात घेतले.