Breaking News

सैन्य दलाचे लाख लाख धन्यवाद - अ‍ॅड. आशिष शेलार

मुंबई, दि. 31, ऑक्टोबर - एलफिस्टन स्थानकावर घडलेल्या दुर्घटनेनंतर मी मुंबईकरांच्या वतीने देशाच्या सैन्य दलाला रेल्वेमंत्र्यांच्या मदतीने हाक मारली. ही हाक रोज रेल्वे  प्रवास करणा-या तमाम मुंबईकरांची होती. तिला साथ देत अवघ्या 24 दिवसांच्या आत भारतीय सैन्यदलाने मुंबईत 3 रेल्वे पादचारी पूल बांधण्याची तयारी दर्शवली ही एक ऐतिहा सिक घटना आहे. त्यामुळे सैन्य दलाचे मुंबईकरांच्या वतीने लाख लाख धन्यवाद, अशा भावना मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी आज पत्रकारांची बोलताना  व्यक्त केल्या.
एलफिस्टन येथे घडलेल्या दुर्घटने नंतर 6 ऑक्टोबर रोजी तातडीने मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी देशाच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन आणि रेल्वे मंत्री  पियुष गोयल यांची नवी दिल्ली येथे जाऊन भेट घेतली होती. मुंबईतील रेल्वे पुलांची सद्यस्थिती पाहता, तातडीने मुंबईकरांना उपाययोजना करून दिलासा देण्याची गरज आहे त्यामुळे  रेल्वे पादचारी पूल लष्कर अभियंता शाखाला बोलवून बांधण्यात यावे अशी संकल्पना त्यांनी मांडली, सैन्य दलाकडे अद्यावत तंत्रज्ञान असून ब्रम्हपुतत्रेवरही त्यांनी रणगाडे जाऊ शके ल असा पूल बांधला आहे अशा तंत्रज्ञानाचा वापर करून त्याच वेगाने मुंबईत पूल बांधले जावेत अशी संकल्पना असलेले विनंती पत्र दोन्ही मंत्र्यांना त्यांनी दिले होते. त्याला तत्वत:  मान्यता देत दोन्ही मंत्रालयांनी त्याच्या तांत्रिक बाबी तपासून घेऊन सैन्य दलातील तज्ञांशी आणि वरिष्ठांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली होती.
त्यानंतर अवघ्या 22 ते 24 दिवसांत अत्यंत वेगाने सैन्य दलाशी चर्चा करून तांत्रिक शक्यता लक्षात घेऊन सैन्य दलाला घटनास्थळी जाऊन त्याचा प्लान तयार करण्यास  सांगण्यात आले. आज 31 ऑक्टोबर रोजी स्वतः या देशाच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी जाऊन  या संपूर्ण प्रक्रियेला मूर्त स्वरूप दिले, यावेळी सैन्य दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अशा प्रकारे मुंबईकरांच्या मदतीला दिल्ली धावून आली आहे, सैन्य दलाने विशेष काम  म्हणून हे आव्हानाचे काम हाती घेतले आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुंबईकरांच्या वतीने दोन्ही मंत्री आणि भारतीय सैन्य दलाच्या तांत्रिक विभागाचे मनापासून लाख  लाख आभार मानतो, आपल्या रक्षणासाठी धावणा-या सैन्य दलाने आज मुंबईकर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी धाव घेतली आहे, हा एक ऐतिहासिक क्षण आहे, अशा भावना  आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केल्या आहेत.