Breaking News

‘व्हीव्हो घाटकोपर’ नाव तीन दिवसात बदलण्याचा ’मनसे’चा इशारा

मुंबई, दि. 28, ऑक्टोबर - देशात चीनी मालावर बहिष्कार टाकत असातांनाच चिनी मालाच्या जाहिराती करून मुंबई मेट्रो या मालाच्या विक्रीला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आला आहे. त्यामुळे व्हीव्हो घाटकोपर हे नाव लवकरात लवकर बदलण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.
घाटकोपर मेट्रो स्थानकाचे नाव ‘व्हीव्हो घाटकोपर’ असे केल्याने चिनी बनावटीचा असलेल्या मोबाईलचे नाव घाटकोपर मेट्रो स्थानकाला देणे चुकीचं असल्याचं मनसेचं म्हणणं  आहे.या विरोधात मनसेने आज घाटकोपर मेट्रो स्थानकासमोर स्वाक्षरी मोहीम घेतली. पुढील तीन दिवस ही स्वाक्षरी मोहीम सुरु राहणार आहे. मुंबई मेट्रोच्या घाटकोपर स्थानकाला  रिलायन्सने ‘व्हीव्हो घाटकोपर’ असे नाव दिले आहे. यापूर्वीही या मार्गावरील पश्‍चिम द्रुतगती मार्ग (अंधेरी पूर्व) या स्थानकाला खाजगी कंपनीचे नाव देण्यात आले होते.