Breaking News

रामराजे नाईक निंबाळकर यांना रामकृष्ण हरी कृषी प्रतिष्ठानचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर

सातारा, दि. 28, ऑक्टोबर - रामकृष्ण हरी कृषी प्रतिष्ठान, पुणे यांच्यावतीने दिला जाणारा सन 2017 चा प्रा.रामकृष्ण मोरे जीवन गौरव पुरस्कार, महाराष्ट्र विधान परिषद सभापती  श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण भारती विद्यापीठाचे कुलपती आमदार पतंगराव कदम यांच्या हस्ते 8 नोव्हेंबर रोजी पुणे येथे समारंभपूर्वक  होणार आहे. जगद्गुरु संत तुकोबांची पगडी, उपरणे, गाथा, तुळशीचे रोप, सन्मानपत्र, आणि 25 हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. रामकृष्ण हरी कृषि प्रतिष्ठानच्या वतीने  दरवर्षी माजी शिक्षणमंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या नावाने जीवन गौरव पुरस्कार राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, शिक्षण, पत्रकारिता, कृषी क्षेत्रात उत्तुंग योगदान देणा-या  व्यक्तीला दिला जातो.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी मंत्रीपद आणि कृष्णां खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून माण, खटाव, खंडाळा आणि फलटण या दुष्काळी भागाचा मोठ्या प्रमाणात विक ास करण्यासाठी केलेल्या प्रयत्नामुळेच अनेक पाटबंधारे प्रकल्प उभे राहिले, त्याद्वारे कायम दुष्काळी पट्ट्यात पाणी पोहोचल्याने तो भाग बागायती झाला, औद्योगिक वसाहती उभ्या  राहिल्याने तरुणांना उद्योग, व्यवसाय, नोकरीच्या संधी प्राप्त झाल्या, शेती व शेतक्यांना दिलासा मिळाला, त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची प्रा. रामकृष्ण मोरे जीवन गौरव  पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे प्रतिष्ठानतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
बुधवार 8 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.30 वा पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे येथे सदर पुरस्काराचे वितरण समारंभपूर्वक करण्यात येणार आहे. याप्रसंगी ज्येष्ट साहित्यिक प्रा. सदानंद  मोरे, आ. निलमताई गोरे, पिंपरी-चिंचवड स्थायी समितीचे अध्यक्ष बाबासाहेब तापकीर इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.