Breaking News

नोकरीचे आमिष दाखवून लाखोंना गंडविणा-या आरोपीस पोलिस कोठडी

औरंगाबाद, दि. 28, ऑक्टोबर - नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बारा जणांकडून प्रत्येकी दोन लाखाप्रमाणे एकूण चोवीस लाख रुपयांची फसवणूक करणा-या राजेंद्र चरणसिंग  पोहाल याला न्यायालयाने सोमवारपर्यंत (ता.30) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. 
पोहालला न्यायालयात हजर केल्यानंतर सहायक सरकारी वकील सय्यद शहेनाज यांनी न्यायालयास विनंती केली, त्याने तक्रारदार किशोर देहाडे व इतरांकडून घेतलेल्या एकूण 24  लाख रुपयांचा काय विनियोग केला. त्या रकमेची कुठे गुंतवणूक केली याबाबत विचारपूस करून ती रक्कम जप्त करावयाची आहे. त्याने दिलेले बनावट नियुक्ती आदेश कुठे तयार के ले, त्या नियुक्ती आदेशावर अधिष्ठाता यांच्या नावाने कोणी खोट्या व बनावट सह्या केल्या याबाबत पोहालकडे विचारपूस करून संगणक व शिक्के जप्त करावयाचे आहेत. या रॅके टमध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे. याबाबत पोहालकडे विचारपूस करून त्यांची नावे निष्पन्न करून त्यांना अटक करावयाची आहे. त्याने कक्षसेवक पदासाठी 48 आणि  लिपिक पदासाठी 50 अशा एकूण 98 सुशिक्षित बेरोजगारांना खोटे व बनावट नियुक्ती आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने तपास करून पुरावे हस्तगत करावयाचे आहेत. पोहालने अ धिष्ठातांच्या नावाचा शिक्का कोठे तयार केला याबाबत तपास करून पुरावा हस्तगत करावयाचा आहे. सदर प्रकरणाची व्याप्ती मोठी असून, यात फसवणुकीची रक्कम वाढण्याची शक्यता  आहे. त्यामुळे सरकारी वकीलांच्या मागणीनुसार न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.