Breaking News

उपेक्षितांच्याही जीवनात दिवाळीचा आनंद फुलविणे हीच खरी दिवाळी : दिलीपकुमार सानंदा

बुलडाणा, दि. 23, ऑक्टोबर -जगी जे वंचित,उपेक्षित, पददलित, रंजले गांजले व दु:खी कष्टी आहेत अशाना प्रेमाने शोधुन त्यांना जवळ करणे हा खरा मानवी धर्म आहे.देव हा  देवळात नसुन तो उपेक्षितांमध्ये आहे. अशा उपेक्षितांच्या जीवनात दिवाळीचा आनंद फुलाविणे ही खरी दिवाळी असून यामध्ये आपण थोडयाफार प्रमाणात जरी हातभार लावला तर  मनाला फार मोठे आत्मिक समाधान मिळते, असे प्रतिपादन माजी आ. दिलीप सानंदा यांनी केले.
दरवर्षी प्रमाणे यंदाही दिपावलीच्या प्रकाशपर्वावर दि.20 ऑक्टोंबर रोजी खामगांव तालुक्यातील अटाळी येथील पारधी वस्तीमध्ये पारधी समाज बांधवांना माजी आ.दिलीप सानंदा  यांच्याहस्ते मिठाई व साडीचे वितरण करण्यात आले त्याप्रसंगी त्यांनी उपरोक्त प्रतिपादन केले. या कार्यक्रमाला काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष डॉ. सदानंद धनोकार, जिल्हा काँग्रेस क मिटीचे सदस्य शांताराम पाटखेडे, कृ.उ.बा.स.सभापती संतोष टाले, माजी जि.प.सदस्य सुरेशसिंह तोमर,श्रीकृष्ण धोटे, कृ. उ. बा. स. संचालक विलाससिंग इंगळे, डॉ.दिलीप क ाटोले,सर्कल प्रमुख जयराम मुंडाले,युवक काँग्रेस ब्रिगेडचे अध्यक्ष तुषार चंदेल, सोपान काटोले, परसराम पांडे, बाळु धांडे, ब्रिजलाल पवार, भगवान सुलताने, संजय गोल्लर यांची  प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना माजी आ.दिलीप सानंदा म्हणाले की, आदिवासी, पारधी समाज बांधवांनी षिक्षणाची कास धरली तर ते उपेक्षित राहु शकत नाही. योग्य मार्गदर्शनाखाली अवगुणांना  तिलांजली देउन जिद्द्, चिकाटी, ठेवून सत्कर्म करण्याचा संकल्प घ्यावा व प्रत्येक विधायक कार्यात स्वत:ला झोकुन दिल्यास समतेचा समृध्दीचा दिवा तेवत राहिल. आदिवासी,  पारधी, भटके, विमुक्त जाती यांच्या जिवनातही दिवाळीचा आनंद उमलून यावा म्हणुन आपल्याकडुन फुल नाही फुलाची पाकळी म्हणुन आदीवासी समाज बांधवांना दिवाळीनिमित्त एक  छोटीषी भेट आहे असे सांगुन त्यांनी सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.