Breaking News

पवई ‘आयआयटी’मधून महागड्या सायकल चोरणा-या व्यक्तीला अटक

मुंबई, दि. 23, ऑक्टोबर - पवई आयआयटी संकुलनमधील महागड्या सायकल चोरून त्या ओएलएक्सवर विकणा-या एका उच्चशिक्षित चोराला पवई पोलिसांनी अटक केली. सात  सायकल पोलिसांनी मुंबई आणि इतर परिसरातून जप्त केल्या आहेत. हरिशचंद्र गाडेकर असे अटक करण्यात व्यक्तीचे नाव असून त्याला 25 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयाने पोलीस क ोठडी सुनावली आहे.
हरिशचंद्र यांत्रिक अभियंता असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हरिशचंद्र आयआयटीमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी येत होता. संकुलनमध्ये शिक्षण घेत असलेली मुले या संकुलनमध्ये  फिरण्यासाठी सायकलचा वापर करतात. या सायकलची किंमत 10 ते 15 हजार रूपयांपर्यंत आहे.