Breaking News

60 लाख रुपयांचा गुटखा जप्त

बुलडाणा, दि. 23, ऑक्टोबर - ऐन दिवाळीच्या दिवशी संपूर्ण जनता लक्ष्मी पूजनामध्ये व्यस्त असतांना या संधीचा फायदा घेऊन गुटखा माफियांनी आपला कार्यभाग साधण्याचा  प्रयत्न केला. परंतु त्यांचा हा प्रयत्न ठाणेदार महेंद देशमुख व त्यांच्या चमुने हाणून पाडला. यावेळी पोलिसांनी 38 लाख रुपये किंमतीचा गुटखा व ट्रक असा एकूण 60 लाख  रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, देऊळगाव राजा कडून चिखलीकडे एका ट्रक मध्ये प्रतिबंधित गुटखा भरून येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या मा हितीच्या आधारे ठाणेदार महेंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रल्हाद मदन, पोहेका नारायण तायडे, सिद्धार्थ सोनकांबळे, नापोका राजू सोनुने, पोका शिवानंद  तांबेकर यांनी 19 ऑक्टोबरच्या रात्री नाकाबंदी केली. यावेळी मेहकर फाट्याजवळ पोलिसांनी एम.एच. 21/ एबी/ 6999 या क्रमांकाच्या ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये  पांढर्या रंगाच्या मोठ्या 80 पोत्यामध्ये अंदाजे 38 लाख रुपये किंमतीचा गोवा गुटखा व ट्रक असा एकूण अंदाजे 60 लाख रुपयांचा माल जप्त केला.
त्यानंतर पोलिसांनी ट्रक चालक सलीम खान रहेमान खान वय 45 रा बाबुलोज चौक, चिखली व त्याचे सोबत असलेला इसम शे. कादर शे. रसूल वय 55 रा. गोरक्षण रोड, चिखली  यास विचारपूस केली असता सदर माल हा चिखली येथील निसार हाजी यांचा असून तो फरार असल्याचे सांगितले. त्यानंतर या घटनेची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे अन्न व  सुरक्षा अधिकारी माहुरे यांना देण्यात आली. माहिती मिळताच माहुरे व शिरोदिया हे 20 ऑक्टोबर रोजी दुपारी पोलिस ठाण्यात आले. यावेळी पत्रकारांनी उशिरा येण्याचे कारण  विचारले असता, त्यांनी दिवाळी निमित्त घरी गेलो होतो. त्यामुळे येण्यास उशीर झाल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे पंधरा दिवसातील ही तिसरी कारवाई आहे.