Breaking News

शिवाजीराव पंडित यांच्या अटकेचा आजही बीड जिल्हयात निषेध

बीड, दि. 01, नोव्हेंबर - माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता बीड जिल्हयात पत्रकबाजीचे राजकारण सुरू झाले असून भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश  पोकळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील यांनी एकमेकांवर आरोप प्रत्त्यारोप केले आहेत.
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना, गजानन, कडा आणि पद्मश्री विखे पाटील या सहकारी साखर कारखान्यांकडे कोट्यावधी रुपयांची थकबाकी आहे, हे कारखाने  आता ऊस असतानाही सुरु होताना दिसत नाहीत, तरीही यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले नाहीत ? मात्र अतिशय प्रतिकुल परिस्थितीत ऊस उत्पादक शेतक-यांच्या हिताचा  निर्णय घेवून आ. अमरसिंह पंडित यांनी जयभवानी सहकारी साखर कारखाना सुरु करण्याचा निर्णय केला. जयभवानीचा बॉयलर गढीमध्ये पेटला आणि परळीमध्ये त्याचे ‘धुपन’  निघाले. केवळ कारखाना सुरु होवू नये म्हणून बंद पडलेल्या बँकेचा वापर भाजपा नेतृत्वाने आ.पंडित यांच्या विरोधात केला, त्याचा निषेध किसान सेलच्यावतीने सुनिल पाटील यांनी  केला आहे असुन पोकळेचा भाजप वापर करत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान पंडीत पिता पुत्रांविरोधात गुन्हा दाखल झाल्याच्या निषेधार्थ आजही कडकडीत बंद पाळण्यात आला.