Breaking News

सोयाबीनच्या भानगडीमुळे बाजार समित्या तीन दिवसांपासून बंद

लातूर, दि. 01, नोव्हेंबर - सोयाबीनला हमी भावही मिळाला पण ऑनलाईनच्या भानगडीने शेतकरी सरकारी खरेदी केंद्राकडे जायला तयार नाही. तर व्यापारी हमीभाव द्यायला तयार  नाही. त्यामुळे लातूरच्या बाजारात 50 हजार क्विंटल सोयाबीन पडून आहे. 
लातूर जिल्ह्यात 11 बाजार समित्या आहेत. या सगळ्या समित्या सोयाबीनच्या या भानगडीमुळे तीन दिवसांपासून बंद आहेत. लातूर जिल्ह्यात लातूर, अहमदपूर, औसा आणि उदगीर  या ठिकाणी सरकारी खरेदी केंद्रे आहेत. पण तिकडे शेतकरी जायला तयार नाही. कारण बरीचशी कागदपत्रे दाखल करायची, आधी नोंदणी करायची. मग एसएमएस येणार. त्यानंतर  सोयाबीन घेऊन जायचे असा हा प्रकार आहे.
3050 रुपये इतका हमीभाव असतानाही व्यापारी शेतकर्यांकडून 1800 पासून खरेदी करीत आहेत. शेतक-यांच्या या नुकसानीची रक्कम सरकारने द्यावी अन्यथा आमदार, खासदार  आणि मंत्र्यांना फिरु देणार नाही असा इशारा शेतकरी संघटनेचे अश्यक्ष राजकुमार सस्तापुरे यांनी दिली आहे.