Breaking News

बागडेंच्या मध्यस्थीने तूर्त आंदोलन मागे

औरंगाबाद, दि. 17, ऑक्टोबर - नारेगाव कचरा डेपो प्रकरणी भोवतीच्या 13 गावांतील ग्रामस्थांनी आंदोलन विधानसभेचे सभापती आणि ज्या भागात कचराडेपो आहे त्या  विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी हरिभाऊ बागडे नाना यांच्या यशस्वी मध्यस्थीने थोड्या प्रयत्नानंतर संप तूर्त फेब्रुवारी पर्यंत स्थगित करण्यात आला आहे. या आंदोलनामुळे  सणासुदीच्या दिवशात शहरात कचर्याचे ढीग दिसू लागले होते. कचरा डेपो जवळ आंदोलन करणारे लोक बसून होते. त्यामुळे महापालिका प्रशासन नेमके काय करावे या विचाराने  भांबावले होते. आंदोलन करणार्या लोकांशी चर्चा करून मध्यस्थी साठी अखेर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना साकडे घालण्यात आले. त्या चर्चेतून गावकर्यांनी महापा लिकेला मुदत दिली असून त्या मुदतीत हा प्रश्‍न न मिटल्यास अधिक तीव्र आंंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.