Breaking News

राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त रन फॉर युनिटी’चे आयोजन

मुंबई, दि. 28, ऑक्टोबर - राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त 31 ऑक्टोबर रोजी ॠरन फॉर युनिटी’ या दौडचे मरीन डाईव्ह येथे आयोजन करण्यात आले आहे. राज्यपाल चे.  विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुख्य समारंभ एनसीपीए सभागृहात होणार आहे. राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ यावेळी देण्यात येणार आहे. त्यानंतर  एकता दौडला मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात येईल. या दौडचे सकाळी 9 वाजता ग्रॅट मेडीकल जिमखाना, मरीन डाईव्ह येथे विसर्जन होईल. सरदार वल्लभभाई पटेल  यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे.