Breaking News

ज्येष्ठ साहित्यिक मो मराठें कालावश

पुणे, दि. 02, ऑस्टोबर - ज्येष्ठ साहित्यिक ह मो मराठे यांचं दीर्घ आजारानं पुण्यात निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात रविवारी  रात्री 1.46 वाजता त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. गेले अनेक दिवस ते आजारी होते.
1940 साली ह मो मराठेंचा जन्म झाला. त्यांनी अनेक कथा आणि कादंबर्‍यांचं लिखाण केलं. लेखक म्हणून प्रसिद्ध असलेल्या हमोंनी पत्रकारीतेमध्येही आपला ठसा  उमटवला होता. त्यांनी किर्लोस्कर मासिकाच्या संपादक मंडळात काम केलं. तसंच लोकप्रभा, पुढारी, घरदार, मार्मिक, नवशक्ती आदी नियतकालिकांसाठीही लिखाण  केलं.