Breaking News

मुंबईत लवकरच भाजपाचा महापौर : किरीट सोमय्या

मुंबई, दि. 12, ऑक्टोबर - पोटनिवडणुकीत भाजपच्या विजयानंतर खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर थेट टीका केली आहे.
‘मुंबई महापालिकेत चिन्हानुसार आता शिवसेना 84 आणि भाजप 83 अशी स्थिती झाली आहे. मी उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान देतो, ही स्थिती लवकरच बदलून भाजप 84 आणि शिवसेना 83 अशी होईल आणि आमचा महापौर बसेल.’ असं वक्तव्य सोमय्यांनी केलं आहे.
शिवसेनेवर टीका करतानाच सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर देखील निशाणा साधला आहे. ‘उद्धव ठाकरेंचा उद्धटपणा आता तरी कमी होणार का?’ असं म्हणत सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर तोफ डागली.