Breaking News

कालचा गोंधळ बरा होता

दि. 13, ऑक्टोबर - सध्या देशभरात एक वेगळं वातावरण निर्माण होऊ पहात आहे,यापुर्वी काँग्रेस देशाचा कारभार पहात असतांना कट्टर हिंदूत्व जपणारी मंडळी हिंदू धरर्म मोडक ळीस आणण्याचा काँग्रेसचा डाव असल्याचे आरोप करून काँग्रेसला बदनाम करीत होते.
आरोप करणारे हिंदूच होते आणि आणि काँग्रेसमधील बहुसंख्य मंडळीही त्याच धर्माची होती.तरीही आरोपांची तिव्रता कायम होती.या उलट आज काय परिस्थिती आहे.
हिंदू धर्माचा ठेका घेतलेली मंडळी गल्लीपासून दिल्ली पर्यंत सत्तेवर आहे,मग तेंव्हा हिंदू धर्म नेस्तनाबूत करण्याचा आरोप काँग्रेसवर करणारे त्यांच्या धर्माला कोणते सःरक्षण देत आहे  असा सवाल एक मोठा वर्ग सोशल मिडीयाच्या माध्यमातून विचारू लागला आहे.
प्रदुषण मुक्त दिवाळी संकल्प अभियान 2017 च्या निमित्ताने मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात प्रदुषणमुक्त दिवाळीची शपथ शालेय विद्यार्थ्यांना दिली. तर  सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत फटाके विक्री बंदचा आदेश दिला आहे. सोबतच मुंबई उच्च न्यायालयाने राज्यात निवासी वसाहतीमध्ये सुरक्षेच्या कारणावरून फटाके विक्रीला बंदी केली  आहे. यावरून देशात राजकीय सामाजिक सांस्कृतिक भुकंप झालेला आहे.
एखादा विषय न्यायालयात असेल तर आम्ही न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर बोलणे सुध्दा टाळत असतो. कारण या देशाची घटनाच इतक्या सक्षम पध्दतीने बनविलेली आहे की त्यात  कोणावरही अन्याय होणार नाही अशी तिची रचना आहे. शासन, प्रशासन, न्याय आणि प्रसार माध्यम अशा या व्यवस्थेत प्रत्येक विभाग आपल्या पध्दतीने चाकोरीबध्दपणे काम करत  असतो. त्यामुळे विविध जाती धर्माचे, पंथांचे, प्रथा, परंपरा, संस्कृती असलेल्या आपल्या देशाचा कारभार हा सुत्रबध्द पध्दतीने सुरू आहे. परंतु अलिकडच्या काळात न्यायालयाच्या  आदेशावर टीका, टिप्पणी समाज माध्यमातून होवू लागली आहे. परवा गुजरातच्या न्यायालयाने 59 कार सेवकांना जाळून टाकणार्या अकरा दोषींची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलून  टाकल्याने देशात एकच वादळ उठले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असतांना गोधराकांड घडले. त्यातून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. यावर टीका टीप्पणी  झाली. मालेगाव बॉम्ब स्फोटातील प्रज्ञा साध्वीसह अन्य तिघांना जामीन मंजुर करण्यात आला यावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली. यावरून एक लक्ष्यात येते की,  न्यायालयाच्या प्रक्रियेवरील आमचा विश्‍वास कमी होत चालला आहे का? एकीकडे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री प्रदुषण मुक्तीची शपथ विद्यार्थ्यांना देतात. प्रदुषणमुक्त दिवाळी संकल्प  अभियान 2017 च्या लाखो रूपयांच्या जाहिराती प्रसार माध्यमांना देतात. दुसरीकडे त्रिपुराचे राज्यपाल श्री रॉय न्यायालयाच्या निर्णयावर आक्षेप नोंदवितात. सत्तेत असलेली शिवसेना  म्हणते की, जगात 199 देशात फटाके फोडले जातात. रामदेव बाबा सुध्दा न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी प्रकट करतात. हिंदुच्या सणांसाठीच फटाके बंदी का? असा प्रश्‍न सर्व  सामाजिक, सांस्कृतिक संघटनांनी उपस्थित केला आहे. शिवाय न्यायालयाच्या निर्णयाला हिंदु-मुसलमान, ख्रिश्‍चन या जातीय समिकरणात बघितले जात आहे. तर मनसेचे एकमेव  नेते राज ठाकरे जनतेने दिवाळीत व्हॉट्सअ‍ॅपवर फटाके फोडायचे का असा प्रश्‍न उपस्थित केलेला आहे. दिल्लीत फटाके फोडणार इतकेच नव्हे तर लोकांना मोफत वाटणार परंतु  दिवाळीत दिल्लीत मोठ्या प्रमाणावर फटाके फुटतील अशा आशयाचे विधान चित्रपट गायक अभिजीत यांनी प्रसार माध्यमातून जाहिरपणे सांगितले आहे. केवळ हिंदुच्याच सणांवर बंदी  का? असा प्रश्‍न विविध पक्षाच्या प्रतिनिधींनी सरकारला आणि न्यायालयाला विचारलेला आहे. दिल्लीतील वाढलेली वाहनांची, उद्योगांची संख्या ही प्रदुषणासाठी कारणीभूत असुन  सरकार त्यावर उपाय योजना का करत नाही? उलट एका दिवसाच्या फटाक्यावर बंदी आणते असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित केला गेला आहे. प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी क रण्यासाठी इको-फ्रेंडली फटाके बनविण्यासाठी सरकारने फटाका उत्पादकांना प्रोत्साहित केले पाहिजे. किंवा त्याच फटाक्यांना मान्यता दिली पाहिजे. परंतु आपल्या देशात तसे  होतांना दिसत नाही. सरकारची ना-लायक धोरणे अशी असतात की, दारू उत्पादन करायला परवानगी आणि राज्यात दारूबंदी, गुटका उत्पादन करायला परवानगी, परंतु गुटका  बंदी. प्लॅस्टिक उत्पादनाला परवानगी परंतु प्लॅस्टिकवर बंदी. सरकारला हे मुद्दाम करायचे असते असे सामान्य माणसाला वाटते. ज्या गोष्टींवर बंदी आणायची आहे त्यांचे उत्पादन क शासाठी? त्यातून होणारा काळा बाजार, भ्रष्टाचार याला सरकारला आतून प्रोत्साहन द्यायचे असते का? असा प्रश्‍न उपस्थित होतो. फटाके बंदीवरून अशाच प्रकारचे वादळ देशात  उठले आहे. दुर्गापुजेला नगाडे वाजविण्यावर बंदी, गणेश उत्सवात ढोल बंदी, होळीसाठी रंगाची बंदी, दहि हंडीसाठी उंचीला बंदी, बैलाच्या शर्यतीला बंदी आणि आता प्रदुषणाच्या  नावाखाली फटाके विक्रीवर बंदी, फटाके फोडण्यावर बंदी अशा प्रकारची बंदी केवळ हिंदुच्याच सणांवर का? असा प्रश्‍न हिंदुत्ववादी संघटनांनी विचारला आहे? विशेष म्हणजे  फटाक्यावरील बंदी केवळ 1 नोव्हेंबर पर्यंतच का? म्हणजे 25 डिसेंबरला ख्रिसमसला आणि 1 जानेवारी नववर्षा निमित्ताने फटाके फोडायला ख्रिश्‍चन समाज मोकळा का? असा प्रश्‍न  विविध संघटनांचे प्रतिनिधींनी उपस्थित केलेले आहेत. मुस्लिम समाजाच्या इद सणाला कापल्या जाणार्या लाखो बकर्यामधून ऑक्सिजन बाहेर पडतो का? मोहरम मधील मातमवर  बंदी नाही, मग हिंदुच्याच सणांवर बंदी का असा विचार या निमित्ताने देशात उपस्थित होतो आहे. आता हिंदुच्या प्रेत जाळण्यावर बंदी आणणे तेव्हढे बाकी आहे. त्यावर सुद्धा बंदी  आणणार का? असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. यावर आता सरकारने मौन न राहता निर्णय घेण्याची गरज आहे. कोणत्याही गोष्टीवर बंदी आणण्याआधी त्यावर  जनमनाचा विचार केला गेला पाहिजे. लोकांकडून सुचना घेवून त्यावर निर्णय करणे देश हिताचे आहे. अन्यथा सरकारने, न्यायालयाने निर्णय करायचे आणि जनतेने ते रागाच्या  आवेशात मोडीत काढायचे त्यामुळे सरकारचा आणि न्यायालयाचा अवमान होण्याची शक्यता नाकारता येत नाही, यावर विचार करण्याची गरज आहे. असे घडत राहिले तर देशात  स्वैराचार, हिंसाचार व अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही. सांप्रदायीक सद्भाव टिकून राहण्यासाठी सर्व संस्थांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
आता या ठिकाणी हिंदू हा धर्म आहे का? हिंदू या शब्दाचा अर्थ काय ? अशा अनुत्पादीत मुद्यांना  फाटा देऊन विद्यमान परिस्थितीवर भाष्य करण्यासाठी हा प्रपंच आहे,हे मुद्दामहून  नमूद करण्याचे कारण इतकेच की या संपादकीय लेखाच्या नथीतून आम्ही हिंदूवादी आहोत किंवा हिंदू द्वेषी आहोत असा तीर कुणी आमच्या दिशेने सोडू नये.कट्टर भारतीय म्हणून  हाही उठाठेव करीत आहोत.कारण या वातावरणामुळे कुणा एका धर्माचे नव्हे तर देशाचे कधीही भरून न येणारे नुकसान होते आहे.हे पक्के ध्यानात ठेवायला हवे.