एएनएस इन्फोव्हली आयटीआयमध्ये युवा संवाद
बुलडाणा, दि. 09, ऑक्टोबर - येथील नामांकित व क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया द्वारा मानांकीत ए एन एस इन्फोव्हली आय टी आय येथे दि 29 सप्टेंबर 2017रोजी नेहरू युवा केंद्र बुलडाणा व ए एन एस इन्फोव्हली आय टी आय यांचे संयुक्त विद्यमाने भारत सरकार युवा व क्रिडा मंत्रालय यांचे वतीने युवा सांसद हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी प्रमुख अतिथि म्हणून जेष्ठ पत्रकार तथा प्रसिद्ध व्यक्तिमत्व विकासाचे उत्कृष्ट व्याख्याते राजेशजी राजोरे, पं गट विकास अधिकारी किशोर शिंदे, भाजपा तालुका अध्यक्ष शरद गायकी, उपसभापति सोळंके तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा डाँ अनिल अमलकार शिवसेना तालुका प्रमुख खामगांव हे उपस्थित होते सर्वप्रथम मान्यवरांचे शुभहस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली या वेळी राजेश राजोरे यांनी उपस्थित युवकांना व्यक्तिमत्व विकासाचे दहा मंत्र आपल्या खुमासदार शैलीमधुन, वेळोवेळी चिमटे घेत विविध सामाजिक राजकीय उदाहरणांचा दाखिला देत सुमारे दिड तासाच्या सुंदर व्याख्यानातुन दिलेत त्यांच्या व्याख्यानाला प्रचंड प्रतिसाद उपस्थित युवकांनी दिला तर किशोर शिंदे यांनीही मार्मिक भाषणातुन उपस्थितांची मने जिंकलीत तर सभापति शरद गायकी यांनी उपस्थितांना वेळ आणी मेहनतीचे महत्व सांगीतली प्रा डॉ.अनिल अमलकार यांनी या वेळी आपल्या अध्यक्षीय भाषणातुन उपस्थित युवकांना अन्याय अत्याचार विरुद्ध लढणे हेच तरुणपणाचे लक्षण आहे तेव्हा आजच्या काळात आवश्यक असलेला सर्व व्यक्तिमत्व मिळविण्याचे आवाहन केले या वेळी ए एन एस इन्फोव्हली आय टी आय चे सर्व प्राध्यापक, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
या कार्यक्रमातील सर्व सहभागी युवकांना युवा व क्रिडा मंत्रालय भारत सरकार दिल्ली यांचे कडुन प्रमाणपत्र वितरित करण्यात आले या कार्यक्रमाचे संचालन वैभव ठाकरे यांनी तर आभार प्रदर्शन मंगेश गायकी यांनी केले.