Breaking News

आईच्या भूमिकेतून सरकारने सहकारी संस्थांना पाठबळ द्यावे - आ.थोरात

ऊस गळीत हंगाम शुभारंभ ; साखर उद्योगांना अनुदान द्या 

अहमदनगर, दि. 19, ऑक्टोबर - ग्रामीण भागाच्या विकासात सहकारी चळवळीचा मोठा वाटा राहिला आहे. साखर कारखानदारी ही शेतकरी,कामगार,व्यापार या सगळ्याांशी निगडीत असून त्यामुळे आर्थिक चक्र फिरते आहे. गरिबांना साखरेसाठी अनुदान देत साखर उद्योगाला मदत करतांना सरकारने आईची भूमिका घेत सर्व सहकारी संस्थांना पाठबळ द्यावे असे आवाहन मा.महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह.साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी अ‍ॅड.माधवराव कानवडे,होते तर व्यासपीठावर आमदार डॉ.सुधीर तांबे,बाजीराव पा.खेमनर, सौ.कांचनताई थोरात,भाऊसाहेब कुटे,शिवाजीराव थोरात, रामदास वाघ, राजेश मालपाणी,बाबा ओहोळ, हरिभाऊ वर्पे, लक्ष्मणराव कुटे,शंकर पा.खेमनर,अमित पंडित,मधुकरराव नवले, केशवराव मुर्तडक, पांडुरंग कोकणे, लहानुभाऊ गुंजाळ, आर.बी.रहाणे,अजय फटांगरे, चंद्रकांत कडलग,सभापती निशाताई कोकणे, नवनाथ अरगडे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदि मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार थोरात म्हणाले कि,साखर कारखाना ही तालुक्याची कामधेनू आहे.अनेक शेतकरी कामगार यांच्यासह विविध व्यापारी या सर्वांच्या प्रपंचाशी निगडीत आहेत. सर्व संस्था कुटुंबाप्रमाणे काळजीपूर्वक जपल्या जात असल्याने सर्व सहकारी संस्थांची वाटचाल कौतुकास्पद सुरु आहे.त्यामुळे सर्वत्र दिवाळीत मंदी असतांना संगमनेर तालुक्यात बाजार पेठ फुलली आहे.कारखाना,दुध संघ,विविध सहकारी संस्था,पतसंस्था,अमृत उद्योग समूह, मालपाणी उद्योग समूह यांचे बोनस,अनामत बाजारात आले आहे.सर्वांच्या जिवनात आनंद व प्रकाश निर्माण करणारा हा दिवाळी सण आहे.यावर्षी सर्वत्र पाऊस चांगला झाला आहे.शेतकर्यांनी कमी खर्चात व कमी क्षेत्रात जास्त ऊसाचे उत्पन्न घेतले पाहिजे. यामुळे शेती व्यवसाय परवडणारा ठरेल.साखर कारखानदारीला अनेक चढ उतार येतात.या आव्हानांना सामोरे जात यशस्वी वाटचाल कायम ठेवायची आहे.यावर्षी 10 लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे ध्येय ठेवून काम करावे.नवीन कारखाना असल्याने गुणवत्ता राहणार आहे.साखर कारखानदारीतून सरकारला ही मोठे उत्पन्न मिळत असते.सरकारने कायम आईची भूमिका घेवून सहकाराला पाठबळ द्यावे.काही ठिकाणी चुकीचे असेल तर शिक्षा ही झाली पाहिजे.मात्र चांगल्या सहकाराला पाठिंबा ही द्यावा.एकीकडे साखरेचे भाव कमी करतांना निश्‍चित असा एफआरपी देण्याचा आग्रह सरकारचा आहे. सर्व गोष्टींसाठी शेतकर्यांवर घाला घातला जात आहे.श्रीमतांची मिठाई,शितपेय यांना थोडी महाग साखर देतांना गरिबांना अनुदानाने साखर द्यावी मात्र सध्याच्या सरकारकडे सहकारासाठी कोणतेही निश्‍चित धोरण नसल्याने सर्वत्र संभ्रम झाला असल्याचे ही ते यावेळी म्हणाले.
याप्रसंगी आ.डॉ.तांबे म्हणाले कि, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरच्या सर्व सहकारी संस्था रायात गौरवास्पद ठरल्या आहेत.थोरात कारखान्याचे व्यवस्थापन अगदी कार्पोरेट दर्जाचे असून बाहेरील ऊस उत्पादक व शेतकर्यांचा मोठा विश्‍वास या कारखान्यावर आहे.कमी वेळेत उभा केलेला हा नवीन कारखाना गुणवत्ता व परिश्रमाचे घोतक आहे.साखर उद्योगाला र्स्थेय निर्माण व्हावे यासाठी सरकारने साखर उद्योगाला अनुदान द्यावे.