Breaking News

सेंट झेवियर्सच्या खेळाडूंची शालेय राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

अहमदनगर, दि. 19, ऑक्टोबर - नुकत्याच पार पडलेल्या शालेय विभागीय हॅण्डबॉल व रोलबॉल स्पर्धेत श्रीरामपूरच्या सेंट झेवियर्स शाळेतील खेळाडूंनी नेत्रदिपक कामगिरी करून विभागीय पातळीवर सुवर्णपदक पटकावले. या दोन्ही संघाची शालेय राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. या दोन्ही संघांना क्रीडा शिक्षिका पुष्पा कोळगे (एन.आय.एस. हॅण्डबॉल कोच), नितीन तमनर व रोलबॉल राष्ट्रीय कोच आनंद पटेकर यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी शाळेचे प्राचार्य फा. मारियो फर्नांडीस, शाळेेचे कोओडीनेटर अनिता पाठक मीस व मिलागरीन कदम मीस व सर्व शिक्षक वृंदांनी शुभेच्छा दिल्या.