Breaking News

हुंडा छळ प्रकरणात आरोपींना तातडीने होणार अटक सर्वोच्य न्यायालयाचे निर्देश

अहमदनगर, दि. 19, ऑक्टोबर - न्यायाधार संस्थेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात महिलांच्या हक्कासाठी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर पहिल्या सुनावणीत महिलेचा हुंड्यासाठी छळ झाल्यास भारतीय दंड अहमदनगर, दि. 19, ऑक्टोबर - सहिता (आईपीसी) 498  (अ) या कायद्यान्वये आरोपींना तातडीने अटक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर मागील मार्गदर्शक तत्वानुसार महिलांच्या हक्काला बाधा येत असल्याने केंद्र सरकार, राष्ट्रीय महिला आयोग, महिला व बालविकास विभाग (भारत सरकार) ला नोटीस काढून,28 दिवसात म्हणणे  मागितले आहे.
महिला वकिलांद्वारा संचलित न्यायाधार संस्थेच्या वतीने एक महिन्यापुर्वी सर्वोच्च न्यायालयात संस्थेच्या सचिव अ‍ॅड.निर्मला चौधरी यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. महिलांची सासरच्याकडून हुंड्यासाठी होणारी पिळवणुक, छळ, अत्याचार प्रकरणाची आकडेवारी संस्थेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आनून देण्यात आली. मुख्य न्यायमुर्ती दीपक मिश्रा, न्यायमुर्ती ए.एम. खानविलकर व न्यायमुर्ती डी.वाय. चंद्रचुड यांनी पहिल्या सुनावणीतच भारतीय दंड सहिता (आईपीसी)498 (अ) या कायद्यान्वये आरोपींना तातडीने अटक करण्याचे निर्देश दिले आहे. या कायद्याचा दुरोपयोग होत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने 27 जुलै रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार हुंड्यासाठी छळ प्रकरणात पती व सासरच्या कुटुंबीयांना अटक न करता, त्या प्रकरणाची एका कमिटीकडून चौकशी करण्याचे सांगितले होते.