Breaking News

शेतमालाला हमीभाव द्या; खरेदी केंद्र सुरु करा

अहमदनगर, दि. 24, ऑक्टोबर - शेतकर्‍यांच्या  कापुस व सोयाबीन या शेतमालाला हमीभाव मिळावा तसेच शासनाने शेती मालाचे खरेदी केंद्र सुरु करावे या मागणीसाठी आज दि.  23 राहुरी तहसिल कार्यालयाच्या आवारात शिवसेनेचे उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी खेवरे म्हणाले, की शासनाने शेतकर्‍यांच्या  शेतमालाला हमीभाव द्यावा  तसेच शासनाने सोयाबीन व कापूस या शेत मालाची खरेदी करावी, अतिवृष्टीमुळे कापूस व सोयाबीनचे  प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी अडचणीत सापडला आहे. कापूस व सोयाबीन मालाला मनमानी भाव देऊन शासनाने शेतकर्‍यांची आर्थिक पिळवणूक चालविली आहे. शासनाने  आठवडेभरात  खरेदी केंद्र सुरु करावे. अन्यथा रस्त्यावर उतरुन शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल.
यावेळी विजय ढोकणे, भागवत मुंगसे, सुनिल शेलार, विजय शिरसाठ, राहुल चोथे, सुनिल कराळे, विशाल लोंढे,  पोपट शिरसाठ, विलास जाधव, सुभाष चोथे, भरत धोत्रे,  भाउसाहेब नेहे, अविनाश पेरणे, संतोश चोळके, राजु सातभाई, शिवा जाधव, बापु म्हसे, संभा पवार, राजु शिरसाठ, अरुण पवार, रविद्र लोंढे, मच्छिंद्र लोंढे, आनंद गागरे, बबलु  धुमाळ, बाळासाहेब सगळगिळे, निलेश धुमाळ, ज्ञानेश्‍वर भनगडे, पंढु माळी, मयुर धुमाळ,   जगन्नाथ धसाळ, राजेंद्र सरोदे आदी शिवसैनिक ठिय्या अंदोलनात सहभागी झाले होते.  यावेळी बाजार समितीचे उपसचिव जरे व कोळसे तसेच तालुका उपनिबंधक कार्यालयाचे सहकार अधिकारी खिस्ती यांच्याशी आंदोलकांनी चर्चा केली. खिस्ती यांनी सांगितले, की  शासनाने कापसाला 4 हजार 320 तसेच सोयाबिनला 3 हजार 50 भाव जाहीर केला आहे.
याप्रसंगी राकेश डंबीर, रोहित आढाव, निखील गुजराथी, मनील नरोडे, देव बागुल, नितीन साबळे, अभिषेक आढाव, अमर नरोडे, विकी कुदळे, मानस लचके, हर्षल नरोडे, निखील  लोढा, चंद्रकांत वाघमारे, स्वप्नील कुलकर्णी, विशाल लकारे, नंदन घाडगे, दीपक मैंदड, सोनू इंगळे, गोलू पिसे, सौरभ होते, आकाश खैरे आदींनी परिश्रम घेतले.