Breaking News

मुळा धरणातील मासेमारी व्यावसायिकांचा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

अहमदनगर, दि. 26, ऑक्टोबर - येथील मुळा धरणात मासेमारी करणा-या स्थानिक व्यावसायिकांना डावलून, वर्तमानपत्रात निविदेची जाहीर नोटीस प्रसिध्द न करता भ्रष्टाचाराच्या  मार्गाने मुळा धरणातील मत्स्यमारीचा पाच वर्षाचा ठेका नवी मुंबई येथील मे.ब्रिज फिशरिज या संस्थेला दिल्याने पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने शुक्रवारी (27 ऑक्टोबर) जिल्हाधिक ारी कार्यालया समोर मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांची चिंगळीतुला करुन राज्य सरकारचा निषेध करण्यात येणार आहे. तर स्थानिक मासेमारी करणारे व्यावसायिक रिकामे  जाले फेकून या प्रकरणातील भ्रष्टाचा-यांना धरुन,त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहेत.
जिल्ह्याला वरदान ठरलेले 26 टीएमसीचे मुळा धरण यावर्षी चांगल्या झालेल्या पावसाने पुर्ण क्षमतेने भरले आहे.या धरणात मुळाथडी मच्छी व्यावसायिक सहकारी संस्थेचे 871 स्था निक सदस्य मासेमारीद्वारे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित आहे.मात्र महाराष्ट्र मत्स्योद्योग महामंडळाने कोणत्याही प्रकारची निविदेची जाहिर नोटीस वृत्तपत्रात प्रसिध्द न करता  भ्रष्टाचाराच्या मार्गाने परस्पर मुंबईच्या मे.ब्रिज फिशरिज कंपनीला 2017-2021 या पाच वर्षासाठी मत्स्यमारीचा ठेका दिल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.यामुळे  स्थानिक मासेमारीचा व्यवसाय करणार्यांवर उपासमारीची कुर्हाड कोसळणार आहे.मासेमारी करणारे स्थानिक आदिवासी व्यावसायिक अडाणी असल्याने डिजीटल पध्दतीचा वापर क रुन ऑनलाईन ठेका त्यांना डावलून मुंबईच्या कंपनीस देण्यात आला.स्थानिक व्यावसायिक जादा दराने ठेका घेण्यास तयार असताना देखील मुंबईच्या कंपनीला ठेका दिल्याने मुळा  धरणातील मासेमारी व्यावसायिक शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याची माहिती मुळाथडी सहकारी संस्थेचे अध्यक्ष भगवान बर्डे यांनी दिली.सदरील  ठेका रद्द करुन स्थानिक आदिवासी जमातीतील मासेमारी करणा-यांना ठेका देण्याची मागणी आंदोलनाद्वारे करण्यात येणार असून संस्थेचे अध्यक्ष भगवान बर्डे,विधी सल्लागार अ‍ॅड.क ारभारी गवळी,देवराम पारधी, भा.ना.पवार,भारत पवार,कॉम्रेड बाबा आरगडे,अशोक सब्बन,प्रकाश थोरात,अ‍ॅड.लक्ष्मण पोकळे,सुधीर भद्रे या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत.