Breaking News

थकबाकी भरल्याशिवाय रोहित्र नाही- बोरसे

अहमदनगर, दि. 27, ऑक्टोबर - पढेगांव येथील गावठाण हद्दीत असलेले रोहित्र दोन महिन्यांत दुसर्‍यांदा जळाले असल्याने सध्या गावचा पाणीपुरवठा अडचणीत आला. या रोहित्रावरील सर्वच शेतकरी आणि ग्रामपंचायतीने असलेली थकबाकी भरल्याशिवाय नवीन रोहित्र रोहित्र उपलब्ध करुन दिले जाणार नसल्याचे सवंत्सर विभागाचे कनिष्ठ अभियंता जितेंद्र बोरसे यांनी सांगितले.
ग्रामपंचायतमार्फत गावठाण हद्दीत ज्या विहिरीवरुन पाणीपुरवठा करण्यात येतो.सध्या त्या विहीरीसाठी वीजपुरवठा करणारे गावठाण हद्दीत असलेले शंभर अश्‍वशक्तीचे रोहीत्र दोन  महिन्यात दोन वेळा नादुरुस्त झाले सुरुवातीला महीनाभर प्रतिक्षा केल्यानंतर दुसरे रोहीत्र बदलून दिले गेले.
त्यानंतर आठ दिवसात तेही अवकाळी पावसात विज पडून जळाले  अद्याप रोहीत्र बदलुन न मिळाल्याने सध्या गावचा पाणीपुरवठाच दोन महीन्यापासुन अडचणीत आला असुन  पाण्यासाठी महीलांची वणवण सुरु झाली आहे.या रोहीत्रावर अवलंबुन असणारे  शेतकरी चांगलेच वैतागून गेले आहे.
कारण विहीरी पाण्याने भरलेल्या असुन पिकांचे तर सोडा पण जनावरांना आणि घरगुती वापरासाठी पाणी काढणे कठीण झाले आहे.नित्याने पाण्याचा उपसा होत नसल्यामुळे  साथीच्या आजारांत आणखी भर पडत असल्याचे दिसुन येत आहे.
याबाबत सवंत्सरचे कनिष्ठ अभियंता जितेंद्र बोरसे   यांचेशी संपर्क केला असता शेतकरी  आणि ग्रामपंचायतने थकबाकीची रक्कम अदा केल्याशिवाय  रोहीत्र बदलून देणार नसल्याची  भूमिका घेतल्यामुळे गावचा पाणीपुरवठा सुरळीत होणे तसे कठीण आहे.