Breaking News

बेकायदा बांधकाम : मुंबई महापालिकेकडून अमिताभ बच्चन यांना नोटीस

मुंबई, दि. 26, ऑक्टोबर - बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेकडून अमिताभ बच्चन यांना ॠएमआरटीपी’ नोटीस आज बजावण्यात आली. ही माहिती माहितीच्या  अधिकारात उघड झाली आहे. एमआरटीपी’ नोटीस बजावण्यात आल्यानंतर बच्चन यांच्या वास्तूरचनाकाराने बांधकाम प्रस्ताव मंजुरीसाठी इमारत विभागाकडे पाठवला. मात्र  प्रशासनाने या प्रस्तावाला मंजुरी दिली नाही. अशी माहिती माहितीचा अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या अर्जाच्या उत्तरात देण्यात आली.
एमआरटीपी’ अंतर्गत नोटीस बजावण्यात आलेल्यांची यादी गलगली यांनी महापालिकेच्या पी दक्षिण कार्यालयाकडे मागितली होती. या अंतर्गत दिलेल्या उत्तरात अमिताभ बच्चन,  राजकुमार हिरानी, ओबेरॉय रियालिटी, पंकज बलानी, हरेश खंडेलवाल, संजय व्यास व हरेश जगतानी या सात जणांना मंजूर आराखड्यात प्राप्त झालेल्या अनियमितता दुरुस्त क रण्यासाठी 7 डिसेंबर 2016 रोजी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. या संदर्भात मुख्यमंत्री व महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून तात्काळ एमआरटीपी कायद्यांतर्गत या बांधक ामावर कारवाई करावी व बेकायदा बांधकाम तोडावे, अशी मागणी गलगली यांनी केली आहे.