दापोलीच्या समुद्रकिनार्याजवळ आढळला दुर्मिळ ऑक्टोपस
दापोली, दि. 08, ऑक्टोबर - दापोली तालुक्यातील लाडघर समुद्रकिना-याजवळ दुर्मिळ ऑक्टोपस आढळला. याबाबतची माहिती मिळताच अनेक जणांनी समुद्रकिना-यावर गर्दी केली. या समुद्रकिनारी आतापर्यंत अनेक वेळा दुर्मिळ सागरी जीवांचे दर्शन घडले आहे. मात्र ऑक्टोपस आढळल्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात येत आहे.
ऑक्टोपस हा समुद्राच्या तळाशी आढळून येतो. मात्र आज चक्क किना-यावर आढळून आल्यामुळे कुतुहलाचा विषय ठरला आहे. ऑक्टोपसला मराठीत अष्टपाद असे म्हणतात. आठ बाहू असणारा ऑक्टोपस हा जलचर प्राणी आहे. या समुद्र किना-यावर अशा दुर्मिळ सागरी जीवन दर्शन घडते म्हणून या समुद्रकिना-याला पर्यटकांची अधिक पसंती मिळाली आहे.