Breaking News

पोल अंगावर पडल्याने मजुराचा मृत्यू

जळगाव, दि. 28, ऑक्टोबर - पाचोरा येथील पाचोरा-वरखेडी रस्त्यावरील भगवती ऑईल मिलजवळील वीज कंपनीच्या पोलची उभारणी करताना पोल अंगावर पडल्याने मजुराचा  जागीच मृत्यू झाला. उत्तम शालिक पाटील (45, रा.खेडगाव नंदीचे, ता.पाचोरा) असे मयत मजुराचे नाव आहे. नांद्रा येथील शालिक लोटन पाटील यांचे ते जावई असल्याचे  सांगण्यात आले. पाचोरा पोलिसात या संदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.