Breaking News

वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांचे त्वरित निलंबन करण्याची राष्ट्रवादी महिला काँग्रेसची मागणी

नाशिक, दि. 28, ऑक्टोबर - दिंडोरी रोडवरील नाशिक महानगरपालिका अंतर्गत मायको दवाखान्यात दिनांक 23 रोजी मोनिका साकेत नावाची महिला प्रसुती उपचारासाठी आली  होती. महिलेची तपासणी केल्यानंतर पुन्हा त्रास झाल्यास या असे सांगितले. घरी परत आल्यावर पुन्हा वेदना झाल्यामुळे महिलेने रिक्षा ने दवाखाना गाठला. परंतु त्या वेळी  दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी किंवा एकही परिचारिका उपस्थित नव्हती. महिलेला कुठल्याही वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने स्थानिक महिलांच्या सहकार्याने रिक्षातच प्रसुती झाली.  या सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍याना निलंबित करावे अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
माणुसकीला काळिमा फासलेल्या या घटनेनंतर तत्काळ वैद्यकीय अधिकाच परिचारिका यांचे निलंबन करण्यात आले. त्यानंतर पुन्हा खातेनिहाय चौकशी होईपर्यंत निलंबन रद्द करून  मग निर्णय घेतला जाईल असे सांगयामध्ये वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना पाठिशी घालण्याचा डाव लक्षात आल्यानंतर लगेचच राष्ट्रवादी महिला काँग्रेस ने नाशिक महानगर पा लिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांची भेट घेऊन चौकशी होईपर्यंत निलंबनाची कारण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी आयुक्तांनी निवेदन घेऊन निलंबन रद्द केले जाणार नाही  असे आश्‍वासन दिले.
यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक शहर अध्यक्षा अनिता भामरे, कार्याध्यक्षा सुषमा पगारे, नगरसेविका समिना मेनन, शोभा साबळे, रंजना गांगुर्डे, मिरा शिंगोटे आदी महिला  उपस्थित होत्या.