Breaking News

भाजपला मदत करणार्‍या जि. प. सदस्यांना अपात्र ठरविण्याला स्थगिती

बीड, दि. 26, ऑक्टोबर - पक्षादेश डावलल्याचा ठपका ठेवून जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी दिलेल्या सहा जि.प. सदस्यांना अपात्र करण्याच्या निर्णयाला राज्याच्या ग्रामविक ासमंत्री पंकजा मुंडेंनी अखेर अंतरिम स्थगिती दिली आहे. ेशिवाजी पवार (पाडळी), अ‍ॅड. प्रकाश कवठेकर (डोंगरकिन्ही), अश्‍विनी जरांगे (अंमळनेर), संगीता महानोर  (दौलावडगाव), अश्‍विनी निंबाळकर (हरि नारायण आष्टा) मंगल डोईफोडे (पिंपळनेर) आ. क्षीरसागर समर्थक हे ते सहा सदस्य आहेत. बीड जि.प.च्या अध्यक्ष निवडीदरम्यान राष्ट ्रवादीचे सर्वाधिक सदस्य निवडून येऊनही जिपवर राष्ट्रवादीला सत्तास्थापना करता आली नव्हती.कारण राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेल्या धस समर्थक पाच सदस्यांनी पक्षादेश  डावलून भाजपला मतदान केले होते तर आ. क्षीरसागर गटाच्या मंगल गणपत डोईफोडे आजारी असल्याचे सांगून मतदानाला गैरहजर राहिल्या होत्या. या निवडणुकीत सदर प्रकरणात  राष्ट्रवादीचे गटनेते बजरंग सोनवणे, सदस्या मंगल सोळंके, अजय मुंडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे आक्षेप अर्ज दाखल केला होता. त्यावर जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्याकडे  सुनावणी झाली. 17 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी सिंह यांनी पक्षादेश डावलल्याप्रकरणी सहाही सदस्यांना अपात्र ठरविले होते. बंडखोर सदस्यांनी बचावासाठी व्हिपच बेकायदेशीर  असल्याचा दावा केला होता; परंतु जिल्हाधिकारी यांनी तो फेटाळून लावला. या प्रकरणात अपात्र ठरलेल्या सहाही सदस्यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे धाव घेतली  होती. पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याच ताब्यात जि.प. असल्याने त्यांनी भाजपला थेट सहकार्य करणार्या पाच व क्षीरसागर समर्थक एका सदस्याला दिलासा देत जिल्हाधिकारी सिंह  यांच्या आदेशाला अंतरित स्थगिती दिली आहे.