Breaking News

लोडशेडिंगची व्याप्ती वाढवून शंभर टक्के वसुली झोनही समाविष्ट

औरंगाबाद, दि. 07, ऑक्टोबर - विजेचा तुटवडा असल्याने गुरुवारी महावितरणने लोडशेडिंगची व्याप्ती आणखी वाढविली. महावितरणने वीज बिल वसुली शंभर टक्के असलेल्या ‘ए’ गटातील फीडरवरही लोडशेडिंग केल्यान ेसपंणूर् शहराताल वीज पुरवठा बंद हातेा. शहराताल विविध भागांत दोन ते नऊ तासांदरम्यान वीजपुरवठा बंद होता. कोळशाच्या तुटवड्यामुळे वीज उत्पादन कमी होत आहे. यामुळे औरंगाबाद परिमंडळासह राज्यभरात नऊ सप्टेंबरपासून लोडशेडिंगला प्रारंभ झाला होता. यानंतर काही दिवस परिस्थिती सुधारली, मात्र मंगळवारपासून (तीन ऑक्टोबर) लोडशेडिंगला पुन्हा सुरवात झाली. जी-एक, जी-दोन आणि जी-तीन गटांत मोडणार्या 23 फीडरसह सात अन्य फीडरवर लोडशेडिंग कायम होते. या लोडशेडिंगमध्ये नऊ सप्टेंबर ते चार ऑक्टोबर या काळात वाढ करण्यात आली. बी, सी, डी, एफ या गटांतील फीडरवरही लोडशेडिंग सुरू करण्यात आले होते. विजेच्या उपलब्धतेची स्थिती गुरुवारी आणखी बिघडली. मागणीच्या तुलनेत वीजपुरवठा कमी झाला. त्यामुळे उद्योजकांना नियमित वीजपुरवठा करण्यासाठी ‘ए’ गटात मोडणार्या अंदाजे दहा हजार ग्राहकांचा वीजपुरवठा एक ते दोन तासांसाठी खंडित करण्यात आला होता.