Breaking News

क्रियाशील ग्लोबल पुरस्कार सिंधुताई सपकाळ व नोरीना फर्नांडिस यांना जाहीर

मुंबई, दि. 23, ऑक्टोबर - सद्गुरु मंगेशदा क्रियायोग फाऊंडेशनकडून उद्या 24 ऑक्टोबरला क्रियाशील ग्लोबल पुरस्कार ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ आणि नोरीना फर्नां डिस यांना प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा दरवर्षी आयोजित करण्यात येत असतो. नि:स्वार्थी भावनेने आपल्या क्षेत्रात समाजकार्य करणार्‍या व्यक्तींना या पुरस्काराने  सन्मानित करण्यात येते. विलेपार्ले येथील नवीन भाई ठक्कर सभागृहात 7 ते 9 या वेळेत हा कार्यक्रम पार पाडणार आहे. यावेळी या कार्यक्रमाला सर्जन डॉ. विनायक श्रीखंडे याची  उपस्थिती असणार आहे. तसेच मुबंईचे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथ हेगडे आणि दूरदर्शनचे माजी अतिरिक्त संचालक मुकेश शर्मा यांचीही उपस्थिती असणार आहे.