Breaking News

अश्‍विनी पौर्णिमा यात्रेनिमित्त तुळजापुरात मोठी गर्दी

उस्मानाबाद, दि. 06, ऑक्टोबर - अश्‍विनी पौर्णिमा यात्रेनिमित्त आज गुरूवारी तुळजापूर शहरात तुळजाभवनी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली  होती. तुळजापुर शहराच्या अवती भोवती बस आणि खाजगी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या पौर्णिमेचे अन्यनसाधारण महत्व असून सीमोल्लंघनानंतर निद्रिस्त  झालेल्या तुळजाभवानी मातेच्या मूर्तीला अश्‍विनी पौर्णिमे दिवशी पहाटे एकच्या सुमारास सिंहासनावर अधिष्ठित करण्यात येते.आजही एक पासून पहाटे साडेतीनपर्यंत  अभिषेक करण्यत आले. नंतरही इतर धार्मिक विधी चालु होत्या हे सारे नजरेत साठवण्यासाठी भाविकांची धडपड चालु होती.या यात्रेसाठी एसटी मंडळाने सोडलेल्या  355 गाडयाही अपुर्या पडल्या तर कोजागिरीचा रात्रीचा उत्सवही थाटात पार पडतो. कर्नाटकातील बहुतेक कुटुंबांची तुळजाभवानी देवी कुलदैवत आज असून मोठया  प्रमाणात कर्नाटकातून भाविक येतात.