बाळ चोरणा-या महिलेचा शोध घेण्यात पोलिसांना यश
नांदेड, दि. 16, आक्टोबर - येथील वाडेकर हॉस्पीटलमधून चोरीला गेलेल्या बाळाचा आणि ते चोरणार्या महिलेचा तपास करण्यात नांदेड पोलिसांना यश आले. या महिलेला पो लिसांनी ताब्यात घेतले असून या कृतीमागचा तिचा हेतू काय याबाबत तपास चालू आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक 10 ऑक्टोबर 2017 रोजी शिल्पा महेश भंडारे रा. उमरखेड हि महिला नांदेड मधील श्यामनगरच्या मनपा दवाखान्यात आपल्या प्रसूतीसाठी आली. तिची प्रसूती झाली पण पोट दुखत असल्याने तिला उपचारासाठी पोट विकार तज्ञ डॉ.शिवाजी वाडेकर यांच्या दवाखान्यात 11 ऑक्टोबर रोजी दाखल करण्यात आले. पुढील तपासणीत तिला सोनोग्राफी करण्याची सूचना देण्यात आली. त्यासाठी शिल्पा दुसर्या दवाखान्यात गेली. तेव्हा तिची एक दिवसाची मुलगी वाडेकर हॉस्पिटलमध्ये होती. परत आली तेव्हा मुलगी गायब होती. याबाबत वाडेकर दवाखाना प्रशासन काहीच सांगत नव्हते. वजिराबादचे पोलीस उपनिरीक्षक किरण पठारे आणि पोलीस कर्मचारी तेथे आले. पोलीस नियंत्रण कक्षातील सीसीटीव्ही फुटेज पाहून त्यात दिसत होते की एक महिला शिवाजी पुतळ्यापासून ऑटो रिक्षात बसली आणि तिच्या हातात एक लहान बाळ होते. सायंकाळी वाडेकर हॉस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेज पहिले असतांना त्यात एक महिला दिसत होती. पुढे पोलिसांनी हि महिला माणसा सोबत दुचाकीवर बसून जात आहे आणि मागे पाहत आहे असे सीसीटीव्ही फुटेज मिळवले. शोध जोरदार पणे सुरु होता. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी सुद्धा अनेक माध्यमां द्वारे या महिलेला शोधण्यासाठी प्रयत्न केले. याबाबत वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला एक बातमी मिळाली की, सिडको भागात एक 40 वर्षीय महिला आहे आणि तिच्या जवळ 2-3 दिवसांपूर्वीच जन्मलेले बाळ दिसत आहे. तेव्हा नांदेड ग्रामीण पोलीस पथकाने पोलीस उप अधीक्षक अभिजित फस्के आणि आपले पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे यांना हि माहिती सांगून त्यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप निरीक्षक गजानन मोरे, पोलीस कर्मचारी नामदेव ढगे आणि शेटे यांनी या महिलेला बाळासकट ताब्यात घेतले आहे.