भारनियमन बंद करण्यासाठी प्रशासनास कोळसा, मेणबत्ती भेट
जालना, दि. 16, आक्टोबर - सणासूदीच्या काळात सुरू केलेले भारनियमन तात्काळ बंद करावे. वाढती महागाई आटोक्यात आणून दिवाळीपूर्वी कर्जमाफीची रक्कम शेतकर्यांच्या खात्यात जमा करावी या व अन्य मागण्यांसाठी शैलेश घुमारे मित्र मंडळाच्या वतीने 13 ऑक्टोबर रोजी जिल्हा कचेरीवर धडक मोर्चा काढून प्रशासनास कोळसा आणि मेणबत्ती भेट देण्यात आली. तरूणांनी दिलेल्या गगनभेदी घोषणांनी संपुर्ण जालना शहर दणाणुन गेले. जनतेच्या सहनशीलतेचा अंत होत असून आमच्या मागण्या मान्य न झाल्यास अधिक तिव्र आंदोलन करण्याचा ईशारा यावेळी शैलेश घुमारे यांनी दिला आहे. जनतेच्या ज्वलंत समस्यांवर आवाज उठविण्यासाठी शुक्रवारी गांधीचमन येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला. विविध मागण्यांचे फलक हातात घेवून निघालेल्या मोर्चातील तरूणांनी ’विद्यार्थ्यांचा विचार करा.. भारनियमन बंद करा.. शेतकर्याचा सातबारा कोरा झालाच पाहिजे.. बँक अधिकार्यांची मनमानी थांबवा.. शेतकर्यांना सरसगट कर्जमाफी मिळाली पाहिजे’ अशा घोषणा दिल्या. कचेरीरोड, उड्डाणपुल, नुतन वासाहत, अंबड चौफुली मार्गे जात जिल्हाधिकारी कार्यालया समोर तरूणांनी घोषणाबाजी देवून आपल्या भावना व्यक्त केल्या. सदरील मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी मंडळाचे संस्थापक शैलेश घुमारे, अध्यक्ष सतीश कसबे, मुकेश जाधव, ओम जोगदंड, लाजरस आठवले, नितीन बोबडे, सागर खरसान, प्रकाश क सबे, जिवन राठोड, सचिन महापुरे, ज्ञानेश्वर भुसारे, अमोल घुमारे, अनिल लोखंडे, विकी लोखंडे, बंटी गायकवाड, दिनार घुमारे, यश जगधने यांच्यासह हजारो तरूणांनी मोर्चात सहभागी झाले होते.