वेण्णा धरणाची गळती काढण्याच्या सुचना
महाबळेश्वर, दि. 9 (प्रतिनिधी) : वेण्णा धरणातून होत असलेली गळती थांबविण्यासाठी लघु पाटबंधारे विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आवश्यक ती उपाययोजना तातडीने कराव्यात, अशा सूचना दिल्या असल्याची माहिती आ. मकरंद पाटील यांनी दिली.
वेण्णा धरणाच्या सांडव्याच्या भिंतीला लागून असलेल्या संरक्षक भिंंतीजवळ खालील बाजूस भगदाड पडल्यामुळे त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू झाली आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. ही बाब निदर्शनास आली होती. या घटनेची पाहणी करून माजी नगराध्यक्ष उज्ज्वला तोष्णीवाल यांनी आ मकरंद पाटील यांना माहिती दिली होती. आ. पाटील यांनी या संदर्भात तातडीने लघु पाटबंधारे व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकार्याबरोबर चर्चा करून तातडीने धरणाला भेट देवून पाहणी केली. यावेळी महाबळेश्वरच्या नगराध्यक्ष स्वप्नाली शिंदे, मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, लघु पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता विजय घोगरे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता एस. एन. गरंडे, कार्यकारी अभियंता बापुसाहेब गाडे, उपअभियंता व्ही. एल. कुलकर्णी, गुण नियंत्रण विभागाचे अभियंता सुर्यवंशी, बाळासाहेब भिलारे, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, उपसभापती संजय गायकवाड उपस्थित होते.