Breaking News

फटाका विक्रीची दुकाने अखेर नागरी वस्तीबाहेर!

बुलडाणा, दि. 13, ऑक्टोबर - नागरी वस्तीत फटाका विक्री बंद करण्याचा  उच्च न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान करत बुलडाणा जिल्हा फटाका असोसिएशने स्वंयस्फृर्तीने दुकाने  नागरीवस्ती बाहेर नेण्याचा निर्णय घेतला असून बुलडाणा अर्बन रेसीडन्सी समोरील राजेश देशलहरा यांच्या मालकीच्या जागेत फटाका दुकाने सूरू करण्याचा निर्णय सर्वानूमते पारीत  करण्यात आला.
नागरी वस्तीतील फटाका विक्री बंदचा आदेश 11 ऑक्टोंबरला सन्मानीय उच्च न्यायालयाने पारीत केला. सदर निर्णय जाहिर झाल्यावर न्यायालयाच्या आदेशाची अंमलब
जावणी क रण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्या आदेशान्वये जिल्हयातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगर परीषद मुख्यधिकारी यांना फटाका विक्रेते व  बुलडाणा जिल्हा फटाका असोसिएशन सोबत बैठक घेऊन नागरी वस्ती बाहेर जागा सूचविण्याचे आदेश दिले.   बुलडाणा फटाका असोसिएशनने उच्च न्यायालयाच्या आदेशाचा  सन्मान करीत जिल्हाधीकारी, तहसीलदार बगळे, मुख्यधिकारी करण कुमार चव्हाण यांना जागा बदलण्याचे आश्‍वासन दिले.  न. प. प्रशासनाने दरवर्षीप्रमाने पोलीस ग्राऊंड जवळील  गुप्ता शाळेत न्यायालयाचे आदेश मिळन्यापूर्वी मान्यता दिली होती. त्यानुसार न.पा.चा व्यवसाय करही भरण्यात आला होता. बुलडाणा फटाका असोशीयनने न्यायालयाच्या आदेशाचा व  नागरीकांच्या जिवीत्वाचा प्रश्‍न गांभीर्याने घेत जागा बदल्याचा निर्णय घेतला. उद्योगपती राजेश देशलहरा यांनी  बुलडाणा फटाका असोशियेशनच्या विनंतीप्रमाने काही तासात जागा  उपलब्ध करून दिली. यावेळी बुलडाणा फटाका असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड.सतीशचंद्र रोठे, सचिव निलेश तायडे, कोषाध्यक्ष रवी डिडोळकर, प्रशांत दिल्लीवाले, शेखर श्रीवास्तव,  मनोज मुळे, अजय केने, कपील सूरोशे, संजय बनसोडकर, सचीन जोशी, प्रकाश छाजेड, नंदू भंडारी, अमोल हिवाळे, हिरालाल गूप्ता, बाळू केने, अवीनाश वाघ यांच्यासह सर्व पदा धिकारी फटाका विक्रेते प्रामूख्याने उपस्थीत होते.