Breaking News

महसुल कर्मचार्‍यांचे तिसर्‍या दिवशीही काम बंदच!

बुलडाणा, दि. 13, ऑक्टोबर - महसुल कर्मचार्‍यांच्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील हजारो महसुल कर्मचारी  गेल्या तीन दिवसांपासून बेमुदत कामबंद आंदोलनात सहभागी झाल्याने सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तर आज दि. 12 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी क ार्यालयासमोर बुलडाणा जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या कामबंद आंदोलनात महिलांसह सर्वच कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला. 
महसूल लिपीकाचे पदनाम बदलून महसूल सहाय्यक असे करावे, नायब तहसिलदार पदाचा ग्रेड पे 4300 वरुन 4800 मान्य करावा, अव्वल कारकून वर्ग 3 या संवर्गाच्या  वेतनश्रेणीमधील त्रुटी दूर करावी, शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती देण्यात यावी. पुरवठा निरीक्षक संवर्गातील पदे हे पदोन्नतीची असल्यामुळे सरळ सेवेने भरु नये, नायब तह सिलदाराकडे सरळ सेवा भरतीचे पदे प्रमाण 33 टक्क्यांवरुन 20 टक्के करुन पदोन्नतीचे प्रमाण 80 टक्के पदे मंजूर करावी, दांगत समितीने सादर केलेल्या प्रस्तावास कोणतीही क पात न करता मंजुरी द्यावी, संजय गांधी, गौण खनिज, रोहयो, निवडणूक, पुरवठा व महसुलेत्तर कामासाठी नव्याने आकृतीबंध तयार करुन मंजुरी आदेश निर्गमित करावे, व्यापगत  पदे पुनर्जिवित करण्याची कार्यवाही करावी, महसूल विभागातील वर्षानुवर्षे अस्थायी पदे स्थायी करण्यात यावे, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरु करण्यात आले.
या आंदोलनात महसूल संघटनेचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार येसकर, जिल्हा कार्याध्यक्ष विवेक मोगल, व्ही.एस.आंधळे, कोषाध्यक्ष नितीन बढे, संजय टेंभिकर, एम.सी.गायकवाड, किशोर  हटकर, ए.पी.तायडे, उपाध्यक्ष डी.ए.सिरसाट, संजय गवई, जी.पी.गोरे, सुनिल खुरपडे, एम.बी.पाटील, एम.एस.काकडे, सदानंद जाधव, के.एम.जाधव, आर.एस.सरोदे, रवी जाधव,  प्रशांत रिंढे, जी.आर.काळवाघे, व्ही.के.सुशीर, अरुण सोनुने, प्रेमकुमार यादव, स्मिता थिगळे, ए.टी.सपकाळ, सुनिल सोनपसारे, सविता चिखलकर, मिना चव्हाण, मिनीषा मनवर,  श्रीमती मोहोकार आदींनी सहभाग नोंदविला.