Breaking News

खल्वायनच्या दिवाळी पाडवा मैफलीत ‘मुजरा स्वरराजाला’

रत्नागिरी, दि. 17, ऑक्टोबर - येथील खल्वायन संस्थेने दिवाळी पाडवा मैफलीमध्ये मुजरा स्वरराजाला हा स्वरराज छोटा गंधर्वांच्या सांगीतिक जीवनावरील विशेष संगीतमय क ार्यक्रम आयोजित केला आहे. येत्या शुक्रवारी (दि. 20 ऑक्टोबर) सायंकाळी पाच वाजता गुरुकृपा मंगल कार्यालयात ही मैफल रंगणार आहे. यात ज्येष्ठ गायिका मधुवंती दांडेकर,  संपदा थिटे, चिन्मय जोगळेकर व पूर्णा दांडेकर गायन करणार आहेत.
कार्यक्रमाची संकल्पना, लेखन, निवेदन मधुवंती दांडेकर यांची आहे. मधुवंती दांडेकर यांना गायनाचा वारसा मातोश्री गायिका मनोरमाबाई सहस्रबुद्धे यांच्याकडून मिळाला. त्यांनी  संगीत विशारद पदवी मिळवली. अनेक संगीत नाटकांतून प्रमुख भूमिका साकारल्या. नाट्यदर्पण, रंगशारदा प्रतिष्ठान, अ. भा. नाट्य परिषद, भारतय गायन समाज, पुणे महानगरपा लिकेचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. चिन्मय जोगळेकर बीए मेकॅनिकल असून नाट्यसंगीताचे शिक्षण जयमाला व कीर्ती शिलेदार यांच्याकडून घेतले. सौभद्र, स्वयंवर, सुवर्णतुला,  होनाजीबाळा, मानापमान, बावनखणी आदी नाटकात गायक नटाची प्रमुख भूमिका त्यांनी साकारली आहे. सौ. संपदा थिटे यांचे शास्त्रीय संगीतातील सुरवातीचे शिक्षण वडील पं. क मलाकर जोशी व माधुरीताई जोशी यांच्याकडे झाले. सध्या जयश्री पाटणेकर यांच्याकडे पुढील शिक्षण घेत आहेत. नाट्यसंगीताचे विशेष प्रशिक्षण जयमाला शिलेदार यांच्याकडे घेतले.  डीईई व एमए संगीत व संगीत अलंकार या पदव्या प्राप्त आहेत. पूर्णा दांडेकर हिचे संगीताचे शिक्षण आजी मधुवंती दांडेकर यांच्याकडे चालू आहे. गांधर्व विद्यालयाची प्रवेशिका पूर्ण  परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण, नाट्यसंगीत पदविका अभ्यासक्रम अ श्रेणीत पूर्ण, फिल्म टेलिव्हिजनचा 2 वर्षांचा ड्रॅमॅटिक्सचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
मैफलीत तबलासाथ हेरंब जोगळेकर, ऑर्गन मधुसूदन लेले, व्हायोलिनसाथ उदय गोखले करणार आहेत. गेली 20 वर्षे रत्नागिरीच्या सांस्कृतिक क्षेत्रात खल्वायन ही संस्था  सातत्याने कार्यरत आहे. आतापर्यंत 240 मासिक आणि 39 मोठ्या संगीत मैफलींचे यशस्वी आयोजन केले आहे. यावेळच्या दिवाळी पाडवा मैफलीचा आस्वाद घेण्याचे आवाहन  अध्यक्ष मनोहर जोशी यांनी केले आहे.