Breaking News

कमानींचे निकृष्ट दर्जाचे काम राष्ट्रवादीने पाडले बंद

अहमदनगर, दि. 11, ऑक्टोबर - शहरात गेल्या चार पाच दिवसांपासून सुरु असलेले  कमानींचे  काम सोमवारी सायंकाळी राष्ट्रवादीच्या  कार्यकर्त्यांनी बंद पाडले.  तसेच आयुक्तांच्या निदर्शनात निकृष्ट दर्जाचे काम आणून दिल्याने लेखी आदेश काढून काम थांवण्यात आले  आहे.
 सुशोभीकरणाच्या नावाखाली सध्या विनापवाना काम सुरु असल्याची खंत यावेळी व्यक्त केली. शहरातील रस्ते लहान असताना विनापर मिशन कमानी उभारण्याचा घाट कशासाठी असा सवाल यावेळी राष्ट्रवादीचे अभिजीत खोसे व सुरेश बनसोडे  यांनी  विचारला. 
सुशोभिकरणाच्या नावाखाली आयआसी नियमांचे उल्लंघन करुन हे काम सुरु करण्यात आले आहे. सध्या सुरु असलेल्या कामांमुळे अ तिषय निकृष्ट दर्जाचे असून भविष्यात याचा त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागणार आहे. तसेच शहरातून मोठी वाहने येत जात  असल्याने यांनाही अडचण होणार असल्याचे पदाधिकार्‍यांनी म्हंटले आहे. राज्यमार्गावरील जसे दिशादर्शक कमानी केल्या त्याप्रमाणे या क मानी व्हाव्यात यासाठी आयुक्तांकडे मागणी केली आहे. यावेळी सुरेश बनसोडे अभिजीत खोसे, संजय झिंजे, अंकुश  मोहिते,  समिर   भिंगारदिवे, रोहित  केदारी आदींसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शहरात सलग रविवार आणि सोमवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसाने सखल भागातही  पाणी झाले आहे. रस्त्यावरील  खड्डंयामध्ये पाणी साचल्याने वाहन चालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत होती. शहरात सध्या सगळीकडेच कचर्‍याचे  ढीग साचले आहेत. पावसाने हा कचरा दुुर्गंधीयुक्त बनला आहे तसेच गटारी तुंबल्याने पावसाचे पाणी गटारीत जाण्याऐवजी गटारीतले  पाणी रस्त्यावरून वाहत आहे.महानगनपालिकेने केलेले रस्ते हे कोणत्या दर्जाचे तयार झालेले आहे हे आता कोणी भविष्यकाराने  सांगायला   नकोय अशीच परस्थिती  सध्या शहरातील रस्त्यांची झाली असून यावर विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.