Breaking News

फुटबॉल स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात

गडहिंग्लज (कोल्हापूर), दि. 23, ऑक्टोबर - येथे 27 ऑक्टोबरपासून सुरू होणा-या अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सहा राज्यांचा सहभाग  असणा-या या स्पर्धेसाठी एकूण दोन लाखांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत . या स्पर्धेचे यंदाचे 13 वे वर्ष आहे. 
ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन (दिल्ली), वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (मुंबई) आणि कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनच्या परवानगीने ही स्पर्धा होत आहे. स्पर्धेतील विजेत्याला  रोख 51 हजार रुपये उपविजेत्याला 31 हजार रुपये, तृतीय क्रमांकास 21 हजार तर चौथ्या क्रमांकाला 15 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. तसचे शिस्तबद्ध संघाला 11  हजार रुपये देण्यात येणार आहे. याचबरोबर सर्वोत्कृष्ट गोलरक्षक, आघाडीपटू, बचावपटू, मध्यरक्षक यांनाही बक्षिसे दिली जाणार आहेत.